राज्यपाल नियुक्त सिनेट सदस्य,प्रा.सुरज दामरे यांचे अंतिम वर्षे परीक्षेसंदर्भात 25 सप्टेंबर रोजी मार्गदर्शन-मा.विरेश बारोळे
उदगीर-अंतिम सत्रातील परीक्षा घेण्यासाठी सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्यानंतर, खूप दिवसापासून स्थगित असलेल्या अंतिम वर्षातील परीक्षा घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.त्यानंतर अंतिम सत्र परीक्षेसंदर्भात विध्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच नवीन ऑनलाइन पद्धतीमुळे विद्यार्थ्यांतील संभ्रम आणखी वाढला आहे.त्यामुळे विध्यार्थ्यांना परीक्षेसंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी राज्यपाल नियुक्त सिनेट सदस्य मा.प्रा.सुरज दामरे यांचे परिसंवाद माध्यमातून मार्गदर्शनाचा उपक्रम मा.विरेश रमाकांतजी बारोळे यांनी आयोजित केले आहे.ह्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण इन्स्टाग्राम Live च्या माध्यमातून @Vireshbaroleofficial या पेजवर आयोजित करण्यात आले आहे.हा कार्यक्रम 25/09/2020 रोजी ठीक 5:30 वाजता आहे.मा.विरेश रमाकांतजी बारोळे यांनी अंतिम वर्षांतील विद्यार्थ्यांना कार्यक्रम पाहण्यासाठी आव्हान केले आहे. विध्यार्थ्यांना काही परीक्षेसंदर्भात अडचणी/शंका असतील तर कार्यक्रमादरम्यान Comments च्या माध्यमातून विचारू शकतात असे मा.विरेश रमाकांतजी बारोळे म्हणाले.