तीन दिवस मोफत रक्त तपासणी शिबीराचा लाभ पत्रकार, स्वातंत्र्य,शेतकऱ्यांनी घ्यावा- पत्रकार महादेव घोणे

 तीन दिवस मोफत रक्त तपासणी शिबीराचा लाभ पत्रकार, स्वातंत्र्य सैनिक ,शेतकऱ्यांनी घ्यावा- पत्रकार महादेव घोणे


       


उदगीर - उदगीर येथील आंतरराष्ट्रीय समाज रत्न पुरस्कार प्राप्त समाजसेवक. लेखक, कवी विजय ( विराज) शिवाजीराव चिखले शेल्हाळकर यांच्या वतीने मोफत रक्ताच्या तपासण्या त्यांच्या उदयकुमार रक्त लघवी तपासणी केंद्र,चवळे कॉम्प्लेक्स देगलूर रोड उदगीर येथे नावं नोंदणी - सकाळी ७ ते संध्याकाळी ६ पर्यंत स्वतंत्र दीनानिमित्य दि.१४- १५-१६ ऑगस्ट हे तीन दिवस करून मिळणार आहेत. या तपासण्या व्यतीरीक्त दुसऱ्या चाचण्या करून घ्यायच्या असतील तर मुळ फी मध्ये ५० टक्के सवलत (सुट) दीली जाईल याची नोंद घ्यावी असे आवहान विजय चिखले यांनी केले आहे.


या शिबीराचा लाभ लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या दै. एकजूट लोकजागृतीचे संपादक महादेव घोणे व दै. महिला एकजूटचे संपादक भगवान सगर यांनी घेतला आहे व सर्वांनी या शिबीराचा लाभ घेऊन आपल्या आरोग्याची कळजी घ्यावे असे अवहान महादेव घोणे केले आहे.