थकीत रक्कम तात्त्काळ देउन उस उत्पादक व वाहतुक ठेकेदाराना दिलासा देन्याची शेतकर्याची मागणी
हदगाव तालुका प्रतिनिधी:- बामनीफाटा परीसरासह हदगाव तालुक्यातील अनेक शेतकर्यानी थकीत रक्कम तात्त्काळ देउन उस उत्पादक व वाहतुक ठेकेदाराना दिलासा देन्याची मागनी जिल्हाअधिकारी यांना निवेदनाद्वारे केली असून
जील्हाअधीकार्यानां तसे असंख्य शेतकर्यानी सह्या करून नीवेदन दीले आहे
भाउराव सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगाम 2019-2020 ची एफआरपी ( किमान आधारभुत किमंत ) ची रक्कम अध्यापही दिली नसल्याने शेतकर्यानी हदगाव तहसिलदार तथा तालुका दंडाधिकारी हदगांव ता . हदगांव जि . नांदेड तहसिल कार्यालय हदगांव मार्फद दीले आहे नीवेदनात पुढाकार सर्व उस उत्पादक शेतकरी व उस वाहतुक ठेकेदार . 2019-2020 उपरोक्त विषयी माहीती कळविण्यात आली . भाउराव सहकारी साखर कारखाना युनीट क .4 हडसणी ता . हदगांव जि . नांदेड या कारखाण्यास हदगाव हिमायतनगर या दोन्ही तालुक्यासह कारखाना कार्यक्षेत्रातील उस उत्पादक शेतक - यांनी मोठ्या प्रमाणात उस दिला , पंरतु कारखाण्याचा गाळप हंगाम 2019-2020 संपुनही चार महिण्यांचा कालखंड लोटुन सुध्दा कारखाणा प्रशासनाने सर्व शेतक - यांची एफआरपी ( किमान आधारभुत किमंत ) ची थकीत रक्कम दिलेली नाही . त्यामुळे उस उत्पादक शेतकरी व उस वाहतुक ठेकेदार हे दोघेही फार मोठया आर्थीक संकटात सापडले आहेत . वास्तविक पाहता ही एफआरपी ची रक्कम खरीप पेरणी हंगामाच्या वेळीच मिळणे अपेक्षीत होते . परंतु ती रक्कम वेळीच देण्यात आली नसल्याने व बँकानीही या वर्षी पिककर्ज देण्यास टाळाटाळ केल्याने नाईलाजास्तव सर्व शेतक - यांना खाजगी सावकाराकडुन अव्वाच्या सव्वा व्याजदराने रक्कम घेउन खरीपाची पेरणी करावी लागली . सध्यास्थीतीत विविध सण सुरू असल्याने पैशाची मोठी गरज असतांनाही पैशे नसल्याने शेतकरी व वाहतुक ठेकेदार मोठ्या अडचणीत सापडले आहेत . त्यामुळे भाउराव साखर कारखाना प्रशासनाने एफआरपी ची थकीत रक्कम तात्तकाळ देउन उस उत्पादक शेतकरी व उस वाहतुक ठेकेदार यांना दिलासा दयावा अशी मागणी शेतकर्यानी निवेदनाद्वारे केली असून शेतकर्याना न्याय मीळवून द्यावा अशी वीनंती शेतकरी बांधवाकडुन करन्यात आली असून शेतकर्याना आतातरी न्याय मिळेल काय ? असा सवाल बामनीफाटासह हदगाव तालुक्यातील अनेक शेतकर्यातुन होत आहे त्याचबरोबर उस उत्पादक शेतकरी व ऊस वाहतूक ठेकेदार यांची आज दि.27 ऑगस्ट रोजीश्री गणपती मंदिर परिसरात बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याचेही सांगण्यात येत आहे प्रतिनिधी अशोक गायकवाड हादगाव