लोकसहभागातून वृक्ष लागवड...
काही दिवसापूर्वी विकास नगर मधील संत तुकाराम हाउसिंग सोसायटी मधील काही मित्र मला भेटले व संत तुकाराम हाउसिंग सोसायटीचे ओपन स्पेस जागेचे मुलांना खेळण्यासाठी साफसफाई करून देण्याची विनंती केली प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहिले असता त्याजागी त्या भागातील कचरा डम्पिंग करण्याची जागा बांधकाम साहित्य टाकण्याची जागा असाच उपयोग त्या जागेचा होत होता. नगर परिषदेचे उपाध्यक्ष तथा आरोग्य व स्वच्छता सभापती #सुधीरभाऊ_भोसले यांना विनंती करून नगरपालिका स्वच्छता विभागातील जेसीपी मशीन संत तुकाराम हाउसिंग सोसायटीतले कामसाठी देण्याची विनंती केली व त्यांनी ते लगेचच मान्य केले .जेसीबी मशीन त्या भागातला मलबा काढून सदर जागा सपाट करून घेतली त्यानंतर दर पाच फुटाला त्या जागेच्या चहुबाजूने झाडे लावण्यासाठी खड्डेही करून दिले. काल मित्रांचा फोन आला आणि त्यांनी मला वृक्षारोपणासाठी बोलावलं . त्या भागातील सर्व लोकांनी स्वखर्चातून झाडे व त्याला ट्री गार्ड अनु ओपन स्पेसचे सुशोभीकरणाचे कामाला लोकसहभागातून सुरुवात केली आहे .ही पाहून एका चांगल्या कामाला सुरुवात करून दिल्याचे समाधान मला वाटले.