लातूर जिल्ह्यात प्लाझ्मा दान करण्यासाठी उदगीरच्या युवकांचे योगदान !!
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था लातूर येथे सलग दुसऱयांदा उदगीरच्या युवकांनी उत्स्फूर्तपणे समोर येऊन प्लाझ्मा दान केले आहे .
आजारातून बरे झालेले प्लाझ्मा दाते स्वेच्छेने पुढे येऊन सामाजिक बांधिलकी ओळखून मोठ्या प्रमाणात प्लाझ्मा दान करण्यास दात्यांचे सहकार्य मिळत आहे .
सद्यस्थित प्लाझ्मा देण्यासाठी पात्र जवळ पास त्रेचाळीस ते पन्नास दाते असून त्यापैकी दोन दात्यानी पुढे येऊन प्लाझ्मा दान केले आहे व परत पुढे एक महिण्यानंतर प्लाझ्मा देण्याची तयारी दाखवली. व तसेच बारा जणांनी लवकरच प्लाझ्मा दान देण्याची तयारी दर्शवली आहे .
कोविड १९ चा रुग्ण बरा झाल्यापासून अठावीस दिवसांनंतर प्लाझ्मा घेतला जातो. प्लाझ्मा म्हणजे रक्तातील द्रवपदार्थ ज्या मध्ये रोगा विरुद्ध लढण्याची प्रतिकार शक्ती तयार झालेली असते. अशाच दात्याचा 400 मिली इतका फक्त्त प्लाझ्मा ( पातळ दर्वपदार्थ ) घेतला जातो त्यामुळे दात्यास कसलाही धोका होत नाही ज्या पद्धतीने आपणास रक्तदान करतो त्याच प्रकारे ही पद्धत आहे . प्रत्येक दात्यास एक स्वतंत्र किटअसते त्यामुळे ही प्रकिया सुरक्षित असून घाबरून जायचे कारण नाही.
मी आता आजारातून बरा झालो आहे आणि पुन्हा काही तरी होईल अशा भीतीपोटी न बाळगता कोविड १९ आजारातून बरे झालेल्या दात्यानी स्वतः हुन प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे यावे व अति गंभीर व मध्यम प्रकारची लक्षणे असणाऱ्या कोरोना रुग्णांना जीवदान मिळण्यास मदत होईल.
आपल्या रक्तातून तयार झालेला प्लाझ्मा दुसऱ्याचे प्राण वाचवू शकतो म्हणून कोरोना पासून बरे झालेल्या प्रत्येक पात्र ( 50 किलो वजन,हिमोग्लोबिन 12.5%)असलेल्या व्यक्तीने प्लाझ्मा दान करा आणि प्लाझ्मा योद्धा बना असे आव्हान विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचे नव्याने रुजू झालेले अधिष्ठाता डॉ मोहन डोईबळे यांनी केले आहे. सदर कार्यक्रम प्रसंगी वैद्यकीय अधीक्षक डाँ. संतोषकुमार डोपे जिल्हा कोरोना नोडल आँफिसर मारुती कराळे पॅथॉलॉजी विभागप्रमुख डॉ.सुरेश चवरे सर व डॉ कानडे सर, डॉ. जाधव सर, मनोविकार शास्त्र विभागप्रमुख डॉ.आशिष चेपुरे व रक्तपेढी प्रमुख (प्लास्मा नोडल अधिकारी ) डॉ. दळवे के. टी. आणि प्लास्मा रक्तदान समितीचे सदस्य डॉ. किरण डावळे डॉ.दीप्ती सोनवणे डॉ.पवार व मीरा पाटील व श्री सुरेंद्र सूर्यवंशी समाजसेवा अधीक्षक व तसेच रक्तपेढी टीम यांनी सर्व प्रक्रिया व्यवस्थित पूर्ण केली.