तात्काळ शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप करा- बाबुराव कदम कोहळीर

तात्काळ शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप करा.. तामसा शहरातील भारतीय स्टेट बँक व मध्यवर्ती बँकेतील अधिकाऱ्यांना बाबुराव कदम कोहळीर यांनी दिलेल्या सूचना.......



हदगाव तालुका प्रतिनिधी:-मागील अनेक दिवसापासून ग्रामीण भागातील खेड्यापाड्यातील शेतकरी हे तामसा येथील भारतीय स्टेट बँक व मध्यवर्ती ग्रामीण बँकेकडे दररोज पिक कर्जासाठी व बेबाकी प्रमाणपत्र करिता चकरा मारत असताना सुद्धा शहरातील दोन्ही बँकेतील मुजोरव्रतीच्या शाखा व्यवस्थापकांना शेतकऱ्याची कसल्याही प्रकारची समस्या ऐकून घेण्याची मानसिकताच नसल्याचे दिसून येत असल्याने अखेर शेतकऱ्याचा राजा व सर्व सामान्य जनतेचा नेता बाबुराव कदम कोहळीकर, यांना तामसा भागातील शेतकऱ्यांची समस्या त्यांच्या कानी पडतातच त्यांनी मंगळवार रोजी दुपारी तामसा शहरातील भारतीय स्टेट बँक व मध्यवर्ती ग्रामीण बँकेतील या दोन्ही शाखा व्यवस्थापकांना शेतकऱ्याच्या पीक कर्जाच्या समस्या सांगून त्यांना तात्काळ पीक कर्जाचे वाटप झाले पाहिजे तसेच शेतकऱ्यांना बेबाकी प्रमाणपत्र देण्यासाठी विलंब न लावता त्यांना ताबडतोब देऊन सहकार्य करा त्याच बरोबर शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी कोणत्याही प्रकारची अडवणूक करू नये असा इशारा बाबुराव कदम कोहळीकर यांनी तामसा शहरातील दोन्ही बँकेच्या शाखा व्यवस्थापक यांना दिला आहे त्यामुळे जमलेल्या हजारो शेतकऱ्यांनी बाबुराव कदम कोहळीकर यांच्यामुळेच आमच्यासारख्या गोरगरीब शेतकऱ्यांना खरंच न्याय मिळाला असून ते शेतकऱ्याचे राजा आहेत अशा प्रतिक्रिया जमलेल्या शेतकऱ्यानी व्यक्त केल्या आहेत 


यावेळी भाजपाचे युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष निळु पाटील कल्याणकर, केशव हरण, दयानंद चव्हाण, अमोल कराहाळे, संतोष बोईनवाड, बबन कदम, आदीची यावेळी उपस्थित होते अशोक गायकवाड हदगाव