शिक्षण क्षेत्रातील देव माणुस हरवला !

शिक्षण क्षेत्रातील देव माणुस हरवला !- रऊफ शेख वाढवणा (खुर्द), ता. उदगीर)



       आज सकाळी झोपेतून उठल्यावर फेसबुक चेक केले, पाहतो तर काय ? भगवान सिंह बायस गुरुजी यांचा फोटो !


मला वाटले गरुजींचा शासनाकडून किंवा एखाद्या सामाजिक काम करणा-या संस्थेकडुन सन्मान वगैरे झाला असेल. परंतु फेसबुक च्या वर टाकलेल्या फोटो च्या वरील लिखानाचे वाचन केले तर मनाला धक्काच बसला ! 


खरंच भगवान सिंह बायस गुरुजी आमच्यातुन निघुन गेले, हे माझ्या मनाला न पटणारे आहे ! 


*एक शैक्षणिक क्षेत्रातील देव माणुस हरवला!* 


 मी यशवंत महाविद्यालय, वाढवणा येथे सन 1998 साली शिकायला असताना भगवान सिंह बायस गुरुजी हे माझ्या वर्गावर शिकवण्या साठी आले, गुरुजी जींचे शिकवणे म्हणजे चार भिंतीच्या आतील शिक्षण नव्हे, तर आदर्श जिवन कसे जगावे, आदर्श नितीमुल्याची शिकवण देणारे शिक्षण !


गुरुजींची जिवन जगण्याची पद्धत अगदी साधी, त्यांनी त्यांच्या आयुष्यात कधीही बडेजाव केला नाही. 


गुरुजीनी माझ्या *वाढवणा खुर्द* गावात गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्यानिमीत्त, तसेच महापुरुषांची जयंती, वृक्षारोपण कार्यक्रम व इतर समाज उपयोगी कार्यक्रमास अनेकदा उपस्थित राहुन मार्गदर्शक केले.


आपल्या जिल्यातच नव्हे तर संपूर्ण देशात गुरुजींनी शिकवलेले विद्यार्थी आज मोठं मोठ्या पदावर काम करीत आहेत, हि गुरुजींच्या कार्याची पावती आहे.


गुरुजी ! मी सतत आपल्या सहवासात राहील्याने, आपल्या कार्याविषयी भरपुर लिखाण करु शकतो,


  पण लिहीताना सुद्धा माझे मन मन दाटुन येते, अतिशय दु:ख होते. 


*माझ्या जिवनाच्या जडणघडणीत ज्यांचा मोलाचा वाटा आहे अश्या माझ्या थोर भगवान सिंह गुरुजींना भावपूर्ण आदरांजली!*


  *(शोकाकुल - रऊफ शेख वाढवणा (खुर्द), ता. उदगीर)*