लातूर जिल्ह्यातील सर्व शाळा तंबाखूमुक्त होणार- शिक्षणाधिकारी डाँ वैशाली जामदार

 


लातूर जिल्ह्यातील सर्व शाळा तंबाखूमुक्त होणार- शिक्षणाधिकारी डाँ वैशाली जामदार



कोव्हिड १९ ह्या महामारीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य, स्वच्छता,पोषक आहार, तणाव निर्मूलन आणि तंबाखूमुक्ती ह्या विषयांवर ऑनलाईन जिल्हास्तरीय प्रशिक्षण शालेय शिक्षण विभाग,आरोग्य विभाग, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम विभाग आणि सलाम मुंबई फाउंडेशन यांच्या वतीने दि.१९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते १ यावेळात झूम मिटिंगच्या साह्याने तंबाखूमुक्त शाळा करणे या विषयावर वेबिनार संपन्न झाले. 


 


यावेळी कार्यक्रमात प्राथमिक शिक्षणाधिकारी डाँ वैशाली जामदार मॅडम यांनी ४ फेब्रुवारी २०२१ पर्यंत लातूर जिल्हातील सर्व शाळा तंबाखूमुक्त करण्यासाठी जिल्हातील सर्व केद्रप्रमुख,मुख्याध्यापक व शिक्षक बांधवांना आवाहान केले.यासाठी आपल्या शाळेचे सर्व निकश व माहिती तंबाखू फ्री अँप वर अपलोड करावे.आपली शाळा व परीसर तंबाखूमुक्त करावे. याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.व जिल्हातील सर्व शाळा तंबाखूमुक्त करणार असे मत मांडले. तसेच राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण विभागाचे प्रतिनिधी आरोग्य अधिकारी डाँ माधुरी उतीकर यांनी ऐलो लाईन अभियान बद्दल माहिती दिली.यावेळी वेबिनार मध्ये 


प्राथमिक शिक्षणाधिकारी,डाँ वैशाली जामदार मँडम,


उपशिक्षणाधिकारी विशाल दशवंत सर ,राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम विभाग,चे प्रतिनिधी डॉ. माधुरी उतीकर मॅडम ,जिल्हातील सर्व गटशिक्षणाधिकारी,सर्व विस्तार अधिकारी,सर्व केंद्रप्रमुख,जिल्हा स्तरीय तज्ञ मार्गदर्शक शिक्षक, तालुका निहाय प्रत्येकी ५ तंत्र सहाय्य शिक्षक उपस्थीत होते.


सलाम मुंबई फाऊंडेशन चे सहाय्यक सामन्य व्यवस्थापक दिपक पाटील ह्यानी तंबाखूमुक्त शाळा अभियान यशस्वी करण्यासाठी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, महाराष्ट्र शासन व शिक्षण विभाग व राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण विभागाचा सक्रिय सहभाग व पाठिंबा असून आपल्या अभियानासाठी अधिकारी व शिक्षकांना पुढिल वाटचाली करिता शुभेच्छा देवून प्रेरित केले. 


सलाम मुंबई फाऊंडेशन चे जिल्हा प्रकल्प समन्वयक शुभांगी लाड मॅडम यानी अधिकारी वर्ग व पदाधिकारी तसेच शिक्षक वृन्द ह्यना पी.पी.टी.सादरीकरण द्वारे तंबाखू मुक्त शाळा व कोविड १९ मुक्त आरोग्यदायी जीवन तसेच तंबाखु मुक्त शाळेचे ११ निकष व Tobacco Free School App विषयी अद्यवत माहीती देवून मार्गदर्शन केले.


 तसेच श्री.स्वामी समर्थ सेवाभावी बहुउद्देशीय संस्था औसा,लखनगावचे लातूर जिल्हा समन्वयक राहुल खरात ह्यानी शिक्षकांना झूम द्वारे जोडण्यासाठी परिश्रम घेतले.शिरुर आनंतपाळचे गटशिक्षणाधिकारी अनिल पागे तालुका समन्वयक सुशिलकुमार पांचाळ व विस्तार अधिकारी यांचे सर्व टीम मिळून तालुक्यातील सर्व शाळा तंबाखूमुक्त करण्यासाठी अंतिम टप्प्यात आले आहेत.अहमदपूर येथील यशवंत विद्यालयाचे तंबाखूदूत महादेव खळुरे हे वेबिनार च्या झूम मिटिंगमध्ये उपस्थित होते.