पांडूरंग विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घरीच उभारले राष्ट्रध्वज
(' स्वातंत्र्य दिनी ' झेंड्याला सलामी देऊन विद्यार्थ्यांबरोबर पालकांनीही गायीले राष्ट्रगीत.)
प्रतिनिधी उदगीर,
जगात सर्वत्र कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. आपल्या महाराष्ट्रातही या महामारीचा मुकाबला करण्यासाठी शासन स्तरावरुन अतोनात प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यात जिल्हा अधिकारी, डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, पोलीस कर्मचारी, सफाई कामगार, सरकारी कर्मचारी, समाज सेवक, पत्रकार बांधव या कोरोनाच्या संकट काळात रात्रंदिवस कार्यरत आहेत. कोरोनामुळे बळींची संख्या वाढतच आहे. सर्वत्र परिस्थिती चिंताजनक आहे. स्वातंत्र्यानंतरचा हा पहिलाच स्वातंत्र्य दिन आहे की जो विद्यार्थ्यांविना शाळेत साजरा करण्यात आला आहे. अशा भयावह वातावरणात विद्यार्थ्यांनी घरीच राहुन स्वातंत्र्य दिन साजरा करावा असे आदेश असल्याकारणाने ऑनलाईन शिक्षण पद्धतीनुसार इयत्ता 5 वी ते 10 वी वर्गातील विद्यार्थ्यांना ध्वजस्तंभ आणि झेंडा बनविण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची माहिती आणि कृती सांगून स्वातंत्र्य दिनाची भावना कलाशिक्षकांनी पालकांच्या/ विद्यार्थ्यांच्या मनोमनी रुजवली. कलाशिक्षक - नादरगे चंद्रदीप बालाजी यांच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमातून श्री पांडुरंग विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घरीच उभारले राष्ट्रध्वज. विध्यार्थ्यांनी राष्ट्रध्वजासमोर रांगोळी काढली, फुले अर्पण करून झेंड्याला सलामी दिली. विद्यार्थ्यांबरोबर पालकांनीही गायीले राष्ट्रगीत. अशा प्रकारे साजरा करण्यात आला स्वातंत्र्यदिन. त्याचबरोबर विद्यालयाचे मुख्याध्यापक- नादरगे एस. व्ही. यांच्या मार्गदर्शनातून निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, ऑनलाईन शिक्षण पद्धतीनुसार घेण्यात आल्या. तसेच गीत गायन स्पर्धाही आयोजित करून त्याचे ऑडिओ/व्हिडीओ त्या त्या वर्गाच्या व्हाट्सअप्प ग्रुपवर मागविण्यात आले. नियमित प्रत्येक पालकांशी संवाद साधून विद्यार्थ्यांच्या अभ्यासासंदर्भात चर्चाही करण्यात येते. अशा अनेक नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांना एक आदर्श शाळा कशी असावी याची प्रचिती झाली. संस्थेचे सचिव- विनायकरावजी बेंबडे साहेब यांनाही पालकांच्या चर्चेतून विद्यालयावीषयी गोडकौतुक ऐकायला मिळाल्यामुळे त्यांनीही शिक्षकांचे अभिनंदन केले. अशा अनेक वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे मोबाईलद्वारे, व्हाट्सअप्पद्वारे नागरिकांनी श्री पांडूरंग विद्यालयातील सर्व शिक्षक कर्मच्याऱ्यांचे स्वातंत्र्य दिनी भरभरून कौतुक आणि अभिनंदन केले..!