" चिठ्ठी ना कोई संदेश जाने वो कौन सा देश जहाँ तुम चले गये "
*लातूरचा आंतरराष्ट्रीय खेळाडू अदित्य अंकुशराव तळेगांवकर यांच्यावर काळाची झडप*
शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित जागतिक एरोबिक्स स्पर्धेत सहभाग

लातूर : जिल्ह्यातील तळेगांव ता देवणी येथील रहिवासी असलेला महाराष्ट्रातील सर्वधिक प्रतिष्ठेचा शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आंतरराष्ट्रीय खेळाडू आदित्य तळेगांव कर यांचे अल्पशा आजाराने वयाच्या (25)वर्षी निधन झाले
आदित्य अंकुशराव तळेगावकर याने जागतिक एरोबिक्स स्पर्धेत सहभागी होऊन अनेक देशावर विजय मिळवून भारतीय तिरंगा फडकविला आहे
आदित्य यांनी राष्ट्रीय व जागतिक एरोबिक्स जिगण्यासतिक स्पर्धेत आपला विशेष ठसा उमटवला शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त प्रतिभावान जीग्नस्ट खेळाडू होता त्यांच्या अकाली जाण्याने क्रीडा क्षेत्रावर शोककळा पसरली आहे
आदित्य तळेगावकर यांना 2017 --2018 मध्ये शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते आदित्य यांना न्यूमोनिया झाला होता त्यांना खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते परंतु रविवारी त्यांची तब्बेत अचानक खालावली अनेक जीवनसत्वाचा अभाव व वजनही अतिशय कमी झाल्याने त्यांचे शरीर उपचारांना प्रतिसाद देत नव्हते अखेर त्यांची प्राणज्योत मालवली जगावर अधिराज्य गाजवू पाहणारा उमदा आंतरराष्ट्रीय खेळाडू अखेर जगाचा निरोप घेतला
अंकुश तळेगांवकर हा मूळचा तळेगाव ता देवणी येथील सर्वसामान्य मंजूर कुटूंबात जन्म झालेला त्यांनी आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी घर सोडून औरंगाबाद येथे वास्तव्यास गेले त्यांनी मोल मजूरी करीत करीत आदित्य त्याच्या भविष्यासाठी अनेक कष्ट घेतले रात्रंदिवस ऑटोरिक्षा चालवून आदित्य यांचे शिक्षण पूर्ण केले आदित्य यांना क्रीडा क्षेत्रात आवड असल्याने अंकुशराव तळेगांवकर यांनी कसल्याच प्रकारे त्यांना काहीच कमी पडू दिले नाही त्यांनी ऑटोरिक्षा चालवून आदित्य यांचा छंद जोपासला होता यांची जाणीव ठेवून आदित्यने आपल्या वडिलांचे महाराष्ट्राचे भारत देशाचे नाव जगाच्या इतिहासात नोंदविले
--------------------------------
*भारताचे नाव साता समुद्रापार घेऊन जाऊन जगाच्या नकाशावर तळेगावचे नाव रेखाटणाऱ्या प्रतिभावान हिरा आपण गमविला*
---शंकरराव पाटील तळेगांवकार उपसभापती
पंचायत समिती देवणी
----------------------------------
आदित्य याने2008 -- ते 2016 या दरम्यान 6 राष्ट्रीय जगेनीस्टिक स्पर्धेत 5 पदके जिंकली होती त्यांच्या दोन्ही गुडघ्यावर शास्त्र क्रिया झाल्यानंतर इंचीयोन येथे जागतिक एरोबिक्स स्पर्धेत आदित्य ने आपला ठसा उमटवला होता आदित्य हा एजल्स कीड इंटरनॅशनल स्कूलमध्ये जिगनिस्टिक व नृत्याचे प्रशिक्षण देत होता आदित्य यांच्या माध्यमातून झालेलं नुकसान भरून निघणार नाही एका गुणी प्रतिभावंत आंतरराष्ट्रीय खेळाडूला शेवटचा निरोप दिलोय हे मात्र नक्की
यांच्या विषयी एवढे म्हणू शकतो" चिठ्ठी ना कोई संदेश जाने वो कौन सा देश जहाँ तुम चले गये '
आदित्य यांना संपूर्ण भारतीयाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली
---------------------------------