सरपंच रंजना नारेवाड, यांच्या संकल्पनेतून पहिल्यांदाच तामसा ग्रामपंचायत कार्यालयात श्रीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना

सरपंच रंजना नारेवाड, यांच्या संकल्पनेतून पहिल्यांदाच तामसा ग्रामपंचायत कार्यालयात श्रीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना इतर ग्रामपंचायतने याचा आदर्श घ्यावा---माधवदादा नारेवाड यांचे आव्हान.


RI


हदगाव तालुका प्रतिनिधी:-हदगाव तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत व व्यापारपेठ म्हणून संबंध नांदेड जिल्ह्यात ओळख आहे परंतु आजपर्यंतच्या कालखंडात तामसा ग्रामपंचायत कार्यालयात कोणत्याही सरपंचांनी किंवा लोकप्रतिनिधींनी गणरायाची प्रतिष्ठापना केली नव्हती पण सध्या कार्यरत असलेल्या सरपंच रंजना नारेवाड, यांनी स्वतः पुढाकार घेऊन ग्रामपंचायत कार्यालयात श्री गणरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे त्यामुळे तामसा ग्रामपंचायतचा इतर ग्रामपंचायत याचा आदर्श घ्यावा असे आव्हान सरपंच प्रतिनिधी माधवदादा नरेवाड, यांनी केले आहे तसेच तामशांच्या ग्रामपंचायत कार्यालयात पहिल्यांदाच यावर्षी श्री गणरायाचे आगमन झाले असून श्री गणरायाने सर्वांना सुख समृद्धी लाभो तसेच गणरायाच्या आशिर्वादाने सगळ्यांचे कल्याण हो अशी श्रीगणरायाच्या चरणी प्रार्थना केली त्याचबरोबर ग्रामपंचायत कार्यालयातील ही परंपरा अखंडित ग्रामपंचायत मध्ये चालू ठेवावी जेणेकरून कोणताही सरपंच प्रतिनिधी आल्यावर ही संकल्पना मोडीत काढू नये अशी अपेक्षा व्यक्त करतो असेही सरपंच प्रतिनिधी माधवदादा नारेवाड, यांनी सांगितले आहे यावेळी ग्राम विकास अधिकारी आनंद शेळके, ग्रा प, सदस्य सुभाष बासटेवाढ, सुरेश देशमुख, विस्ताराधिकारी सूर्यवंशी, अविनाश पांडे, अशोक खरात,आदी जणांची यावेळी उपस्थिती होती प्रतिनिधी अशोक गायकवाड हदगाव