नांदेड जिल्ह्याच्या विकासासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख पदी** आष्टीकर रहावे ही जनतेची इच्छा

नांदेड जिल्ह्याच्या विकासासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख पदीआष्टीकर रहावे ही जनतेची इच्छा



हदगाव तालुका प्रतिनिधी:-(अशोक गायकवाड) शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दवजी ठाकरे साहेबांनच्या आदेशाचे पालन करणारे एक कट्टर शिवसैनिक म्हणून नांदेड जिल्ह्यात परिचित असलेले तसेच हदगांव हिमायतनगर विधानसभा मतदार संघाचे माजी आ नागेश पाटिल आष्टीकर याना शिवसेनेत दहा वर्षे इमाने इतबारे पक्षाची सेवा केली अशा सच्च्या कडवट शिवसैनिकास मागील विधानसभेला उभे करून जनतेनी आमदार सुध्दा केले त्या आमदारकि चा फायदा त्यांनी मतदार संघातील सर्व सामान्य जनतेला करुन दिला 


 


    शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख मा. उध्दव ठाकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जमेल तेवढा निधी हदगाव हिमायतनगर तालुक्यात आणनारे एक मेव परिचित असलेले आष्टीकर यांनी मतदारसघातील प्रत्येक गावात रस्ता, पानी ,लाईट,वेगवेगळे समाज मंदिर सभागृह, पिव्हर ब्लॉक चे रस्ते,असंख्य गाव पातळीवरचे कार्यकर्ते सांभाळण्यासाठी त्यांनी आटोकाट प्रयत्न केले दरवर्षी कोट्यावधी रुपयाच्या निधीचे विकास काम त्यांनी हदगांव हिमायतनगर तालुक्यात केली आहेत त्यामुळे ते मतदारसंघात परिचित आहेत पण हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा नेहमी बालेकिल्ला राहिला आहे पण यावेळेस स्वकियामुळे आपल्याला पराभवाला सामोरे जावे लागले त्यामुळे मतदरसंघातील शिवसैनिक थोडे हतबल झाले होते पण आता नागेश पाटील यांना शिवसेनेचे जिल्हा प्रमुख पद मिळणार असल्यामुळे सर्व सामान्य जनतेत आनंदाची वातावरण असल्याने पाहण्यास मिळत आहे व संपूर्ण नांदेड जिह्यातील शिवसैनिका मध्ये पुन्हा नवचैतन्य निर्माण होईल त्यामुळे दादाला जर जिल्हा प्रमुख पद मिळाले तर त्या पदाच्या आधारे आपल्या नांदेड जिल्ह्यात असंख्य कामे करता येतील जिल्ह्यात शिवसैनिकाची होत असलेली पिळवणूक या पदामुळे होणार नाही व नव तरुण शिवसैनिकांना पुन्हा एकदा आपल्या जिल्ह्यात भगवा फडकवण्यासाठी एकजुटीने तयार होतील पुन्हा एकदा या तालुक्यात भगव्याचे वादळ दिसेल त्यामुळे पक्षश्रेष्ठी आता नांदेड जिल्ह्याचे शिवसेना जिल्हा प्रमुख पद कोणाला देतील याकडे मात्र पूर्ण नांदेड जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.