चंदर अण्णा प्रतिष्ठानच्या वतीने भव्य रामदास पाटील यांचा सत्कार

 चंदर अण्णा प्रतिष्ठानच्या वतीने भव्य रामदास पाटील यांचा सत्कार



श्री रामदास पाटील सुंमठाणकर यांची अहमदपूर येथील भक्ती स्थळ  ट्रस्टच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल व हिंगोली जिल्हा परिषदेचे प्रशासन अधिकारी म्हणून पदोन्नती मिळाल्याबद्दल त्यांचा विकास नगर उदगीर येथे चंदर अण्णा प्रतिष्ठानच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी उदगीरचे उपजिल्हाधिकारी श्री मेंगशेट्टी साहेब होते तर प्रमुख पाहुणे म्हणून वीरशैव लिंगायत समाजाचे अध्यक्ष चंदर अण्णा वैजापूरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सिद्धेश्वर पाटील, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन भरत भाऊ चामले साहेब, चंगळा माता आश्रम शाळेचे अध्यक्ष बसवराज पाटील साहेब, युवा नेते चंदर अण्णा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत पाटील आदीच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


याप्रसंगी  रामभाऊ सोनटक्के, डॅा.मिठारे साहेब,अॅड.राजकुमार हसनाबादे,प्रमोद शेटकार, अशोक कापसे, उमाकांत सुदाळे,संगम महाजन, मुक्रमाबादचे प्रसिद्ध व्यापारी दिनेश आवडके, केमिस्ट्री क्लासेसचे संचालक सिद्राम शेटकार सर , कल्याण बिरादार, शिवकुमार पांडे ,विठ्ठलराव मुंडे, शिवाजीराव पाटील ,सुगावे स्वामी, रमेश खंडोमलकेआदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन गुंडप्पा पटणे सर तर आभार  श्रीकांत पाटील यांनी व्यक्त  केले.