शेकापुरला कंटेंनमेंट झोन
उदगीर-शेकापुर येथे कोरोना पॉझिटिव पेशंट आढळला मुळे, गावचे कर्तव्यदक्ष सरपंच व ग्रामसेवक उज्वला जाधव मॅडम यांनी तात्काळ गावांमध्ये सॅनिटायझर ची फवारणी चालू केली. व गावातील नाले सफाई चालू केली. भगवान कांबळे, अंकुश कोनाळे व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी देखील गावातील सर्व नागरिकांना सज्ज करून गावांमध्ये covid-19 चा प्रादुर्भाव होऊ नये. म्हणून जनजागृती केली. ग्रामसेवक मॅडम यांनी घरोघरी जाऊन तपासणी केली. तसेच अशा कार्यकर्ते सौ. विजया प्रल्हाद सावंत व त्यांची टीम यांनी घरोघरी जाऊन सगळ्या लोकांची तपासणी करून त्यांना घरी राहण्याचे आवाहन केले. जागोजागी सोशल डिस्टंसिंग ठेवून राहण्यासाठी लोकांना व ज्येष्ठ नागरिकांना आदेश दिले. आशा कार्यकर्ता 24तास गावांमध्ये राहून लोकांची तपासणी करत आहेत. त्यां त्यांच्या परिवाराचा पासून लांब राहून ही सगळी सुरक्षा यंत्रणा पार पाडत आहेत. तसेच गावातील सरपंचांनी पान टपरी, गावातील किराणा दुकाने, विविध व्यवस्थेच्या लोकांना मार्गदर्शन केले. गावातील नागरिकांना गावांमध्ये सोशल डिस्टसिंन पाळून काम करण्यासाठी आदेश दिले.