तहसील कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांना दांपत्याने केली मारहाण

तहसील कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांना दांपत्याने केली मारहाण


सौ अरुणा सुदर्शन तवर पती-पत्नी दांपत्यास अटक



________________________


        हदगाव तालुका प्रतिनिधी :-हदगांव तहसील कार्यालयातील कर्मचार्‍यांना मारहाण करून चावा घेतला तसेच शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी ऑल इंडिया अँटी करप्शन कमिटी या सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थेचे सदस्य म्हणून घेणारे सुदर्शन व त्याची पत्नी अरुणा यांच्याविरुद्ध हदगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करून अटक केली आहे .


 


हदगाव येथील रहिवासी असलेले सुदर्शन तवर हे नेहमी तहसील कार्यालयात येतात व काहीतरी कारण काढून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करतात अशा वेळोवेळी तहसीलदारानकडे कर्मचाऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या. त्यातच अरुणा तवर ही सुद्धा आपल्या पतीला सोबत घेऊन अनेक कर्मचाऱ्यांवर दबाव आणत असल्याच्या सुद्धा तक्रारी आहेत. पोलीस स्टेशन, भुमिअभिलेख, सामाजिक वनीकरण विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, कृषी विभाग, पंचायत समिती, ईत्यादी कार्यालयात कोणतेही काम नसताना कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालतात. अशा त्यांच्या विषयी अनेक कर्मचार्‍यांच्या तक्रारी केल्याचे ऐकण्यात येत आहे. आज सुद्धा त्याच प्रमाणे त्यांनी तहसील कार्यालयात चतुर्थ श्रेणी कर्मचारी शिंधुताई चुनोडे यांच्या सोबत गैरवर्तन करून अश्लील भाषेत व खालच्या भाषेत टिप्पणी करून शिवीगाळ केली. तसेच अरुणा सुदर्शन तवर यांनी थेट मारहाण करण्यास सुरुवात केली. आणि तीला सुदर्शन याने साथ देवून दोघांनी सुद्धा दोन तीन कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केल्याची तक्रार आहे. याप्रकरणी तहसील कार्यालयातील कर्मचारी सिंधुताई चुनोडे यांनी दिलेल्या तक्रारीत आपल्या बोटाला चावा घेतला, दोघांनी थापड बुक्यांनी मारहाण करून वाईट ऊद्देशाने हात धरला. तसेच सरकारी कामात अडथळा निर्माण केला असे म्हटले आहे. तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी गुन्हा दाखल केला व लगेच आरोपींना अटक करून त्यांनी वापरलेल्या वाहनासह पोलीस ठाण्यात आणले. या प्रकरणी अधिक तपास हदगाव पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अवधूत कुशे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संगीता कदम ह्या करत आहेत प्रतिनिधी अशोक गायकवाड