उदगीर व जळकोट कोविड सेंटर मधील प्रशासनाचा गलथान कारभार उघडकीस

उदगीर व जळकोट कोविड सेंटर मधील प्रशासनाचा गलथान कारभार उघडकीस



गेल्या काही दिवसात उदगीर तालुक्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. रुण शेवटच्या टप्प्यात उपचारासाठी येतात असा आरोप जिल्हाधिकारी ते डॉक्टरपर्यत केला जातो. कोविड रुग्णालयात सर्व सुविधा उपलब्ध असून रूग्णांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते, येथे आल्यानंतर तात्काळ उपचारास सूरुवात होते असाही दावा डॉक्टरांच्या वतीने केला जातो. पण कांहि वेळेस त्याच्या उलट परीस्थिती दिसत असून सेतोषी माता नगर एका 75 वर्षाच्या वयोवृध्द पॉझेटि०ह रुणास डिसचार्ज दिल्यानंतर त्यांच्या घरापर्यंत रूग्णवाहिकेतून सोडणे गरजेचे होते पण त्यास दुधिया हनुमान येथेच सोडले जाते. वार्डमध्ये रुग्णांना वेळेवर जेवण दिले जात नाही. अशा बऱ्याच तक्रारी वाढत असून असाच एक प्रकार एका कुटुंबास उदगीर येथे आला. खाजगी दवाखातून कोवीड येथे पाठवण्यात आले होते. पण कोविड रुग्णालयात आल्यानंतर दोन तास उपचारासाठी वाट पहावी लागल्यामुळे रुणाचा जीव गेल्याचा आरोप मृत रुग्णाची पत्नी करत आहे. तर जळकोट येथे


कोरोना रुग्णासाठी कोविड सेंटर बनवण्यात आले आहे.पण आज या कोविड सेंटर मधील प्रशासनाचा गलथान कारभार कोविड रुग्ण असलेल्या निवेदिता देवशेट्टे यांनी उघडकीस आणलेला आहे.या कोविड सेंटर मध्ये रुग्णांना कसल्याही प्रकारच्या सुविधा दिल्या जात नाहीत.४८ तास उलटुन गेले तरीही कुणीही चेकअप साठी येत नाहीत.कोविड सेंटर मध्ये शुगर,बीपी चे आजार असलेले रुग्ण सुद्धा आहेत. त्या रुग्णांची विशेष काळजी घेणे गरजेचे असताना.त्यांची कोणतीही काळजी घेतली जात नाही.या रुग्णांना जेवण सुध्दा वेळेवर दिले जात नाही दुपारी ४ च्या सुमारास अनेक वेळा जेवणाची मागणी केल्यानंतर जेवण दिले जाते.कोविड सेंटर मध्ये केवळ ३ स्वच्छतागृह आहेत पण त्यांची अजिबात स्वच्छता नाही.स्त्रियांसाठी वेगळ्या स्वच्छता गृहाची व्यवस्था नाही.आमची खाजगी दवाखान्यात उपचार घेण्याची परिस्थिती असताना ही केवळ आम्ही शासकीय यंत्रणेवर विश्वास ठेऊन सर्वजण इथे दाखल झालो पण इथे रुग्णांची आजारातून मुक्तता करण्याऐवजी त्यांना मृत्यूच्या तोंडात ढकलले जात आहे.आमचा जळकोट तालुका हा मागास आहे.इथल्या गोरगरीब जनतेला शासकीय यंत्रणेवर अवलंबून राहिल्याशिवाय पर्याय नाही पण प्रशासकीय यंत्रणा इथे कुठेही काम करताना दिसत नाही.कोविड रुग्ण डॉ.निवेदिता देवशेट्टे यांनी हा सर्व प्रकार जळकोट तहसीलदार यांच्या निदर्शनास आणुन दिले असता.जळकोट तहसीलदार यांनी रुग्ण डॉ. निवेदिता देवशेट्टे यांना वैयक्तिक बोला असे सांगितले.पण सर्वसामान्य व्यक्तीच काय ? त्यांचे हाल कधी थांबनार ?त्यांची व्यवस्था कोण करणार ? असे प्रश्न त्यांना विचारले असता त्यांनी विनाकारण आमच्याशी वाद घालु नका असे बेजबाबदार पणाचे उत्तर जळकोट तहसीलदार यांनी रुग्ण डॉ.निवेदिता देवशेट्टे यांना दिल्याचे रुग्ण डॉ.निवेदिता यांनी सांगितले.रुग्णांना धीर देण्याऐवजी जळकोट तहसीलदार असे उद्धट वागत असतील तर रुग्णाचे हाल काय होतील ? आम्हाला कोविड सेंटर मधील सुविधांविषयी तहसीलदार यांच्याकडून अपेक्षित उत्तर मिळाले नाही. 


म्हणुन डॉ. निवेदिता देवशेट्टे यांनी लातुर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित भैया देशमुख, राज्यमंत्री संजयजी बनसोडे,जिल्हाधिकारी जी श्रीकांत सर यांनी जळकोट तालुक्यावर जातीने लक्ष घालून आवश्यक असे सुविधापूर्ण कोविड सेंटर द्यावे व इथल्या रुग्णांची होणारी हेळसांड थांबवावी अशी विनंती केली आहे..