हदगावचे गटशिक्षण कार्यालय झाडाझुडपाच्या विळाख्यात व घाणीच्या साम्राज्यात वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज

हदगावचे गटशिक्षण कार्यालय झाडाझुडपाच्या विळाख्यात व घाणीच्या साम्राज्यात वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज


 


हदगाव तालुका प्रतिनिधी:-हादगाव तालुक्यातील जि प शाळेचे मुख्य कार्यालय म्हणजे हादगाव येथील गट शिक्षण कार्यालय होय या ठिकाणी ग्रामीण भागातील शाळेवरील शिक्षक वर्ग पालक वर्ग विविध कामाकरिता हदगाव च्या गटशिक्षण कार्यालयात नेहमीच येत असतात परंतु सदरचे गटशिक्षण कार्यालय हेघाणीच्या व झाडाझुडपाच्या विळख्यात सापडले असल्याने यावर कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांना लक्ष देण्यासाठी वेळ का मिळत नाहीअसा प्रश्न शिक्षण प्रेमी नागरिकांना पडला आहे त्यातच गटशिक्षण कार्यालय परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे याशिवाय कार्यालय परिसरात मोठ्या काटेरी बाबळीचे झाडे गवत पडलेल्या पावसाचे साचलेले पाणी यामुळे गटशिक्षण कार्यालय परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरली असल्यानेगटशिक्षण कार्यालयातील कर्मचाऱ्यांची आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचेही सांगण्यात येत आहे


तसेच शासन स्वच्छतेसाठी विविध योजना राबवून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देत आहे परंतु शासनाचे काही अधिकारी अशा चांगल्या योजनेला केराची टोपली दाखवत असल्याचे ताजं उदाहरण म्हणजे हदगावच्या गट शिक्षण कार्यालय परिसरात असलेल्या आस्वच्छते वरून दिसून येत आहे तरीदेखील हदगावच्या गटशिक्षण अधिकारी यांना व संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना याचे काहीच सोयरसुतक वाटत नसल्याचे दिसून येत आहे. प्रतिनिधी अशोक गायकवाड हदगाव