नापिकी व कर्जबाजारीला कंटाळून शेतकऱ्यान केली आत्महत्या

नापिकी व कर्जबाजारीला कंटाळून शेतकऱ्यान केली आत्महत्या हिमायतनगर शहरातील


 येथील घटना ...



      हदगाव तालुका प्रतिनिधी:- सततची नापिकी, व बैन्केचा वाढलेला कर्जाचा बोजा आणी यंदा अतिवृष्टिने झालेल्या पिकाचे नुकसान पाहून हतबल झालेल्या ६२ वर्षीय शेतकऱ्यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. हि दुर्दैवी घटना दि.२४ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता उघडकीस आली असून, या घटनेमुळे शेतकऱ्याचे कुटुंब निराधार झाले आहे. 


 


शंकर पोतन्ना तुंगेवाड असे मयत शेतकऱ्याचे नाव असून, तो हिमायतनगर शहरातील रहिवासी आहे. मयत शेतकऱ्याच्या नावाने ७.५ एकर जमीन असून, दोन्हीं तुकड्यावर भारतीय स्टेट बैंकेचे कर्ज आहे. यावर जवळळपास ७० ते ८० हजारांचे कर्ज आहे. यामुळे कंटाळून शेतकरी कामस्स्तही पुण्याला गेला होता, मध्येच कोरोना महमरीचे संकट उभे राहिल्याने परत गावी आला होता. खरीप हंगाम सुरु झाल्याने शेतकऱ्याने आपल्या शेतीत कापूस, सोयाबीन, मूग, तुरीची पेरणी केली होती. शासनाने कर्जमाफी केल्याने आपले नाव कर्जाच्या यादीत आले का यःची पाहणी केली मात्र कर्ज माफी झाली नसल्याचे शासनाच्या कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्याला मिळाला नव्हता. त्यामुळे शेतकरी गेल्या अनेक ददिवसापासून चिंतीत होता. वाढत कर्जाचा बोजा आणि कोरोनाचे साव मध्येच १५ दिवसात झालेली अतिवृष्टी यामुळे शेतात टाकलेली सोयाबीन, कापसाची पिके पाणी साचुन उन्मळून गेली. आज दि.२४ रोजी सकाळी मयत शेतकरी शंकर शेतीची पाहणी करण्यासाठी गेला होता. 


 


पिकाची विदारक परिस्थिती पाहून आणि मागील कर्जमाफी झाली नाही, वरून कर्ज भेट नाही आता मुलं बाळाचे पालन पोषण कसे करावे, या चिंतेने शेतकऱ्यास घेरले. त्यामुळे जगून काय फायदा असा विचार करून त्याने शेतातील झाडाखाली ठेवलेले फवारणीचे औषध प्राशन केले. हा प्रकार लक्षात येताच नातेवाईकांनी त्यांना तातडीने हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. दरम्यान वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यास मृत घोषित केले. मयत शेतकऱ्याच्या पश्चात एक मुलगा, तीन मुली, पत्नी, भाऊ असा मोठा परिवार आहे. या दुदैवी घटनेमुळे शेतकऱ्याचे कुटुंब निराधार झाले असून, यातून सावरण्यासाठी शासनाने मयताच्या कुटुंबीयास तातडीने आर्थिक मदतीचा हात द्यावा आणि कर्जमाफीमध्ये समाविष्ठ करून कर्जमुक्त करावे अशी मागणी प्रहार सांघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष बालाजी बालपेलवाड यांनी केली आहे. प्रतिनिधी अशोक गायकवाड सह आधार न्यूज हदगाव