*अहवाल निगेटिव्ह जनसेवेसाठी सज्ज*
पर्यावरण, पाणी पुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री ना. संजय बनसोडे
लातूर : कोरोनाची लागण झाल्यानंतर मुंबई येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना १५ ऑगस्ट रोजी राज्यमंत्री संजय बनसोडे यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला. यादरम्यान घेतलेली काळजी व कुंटुबाला दिलेला आधार याचा अनुभव शब्दात मांडला आहे. कोरोना काळात रुग्णांना मानसिक आधार मोलाचा वाटत असतो . रूग्णांना व त्यांच्या कुटुंबाला मानसिक आधार देणे आवश्यक असते.आता अहवाल निगेटिव्ह आला आहे व लवकरच लोकसेवेचे कार्य पुन्हा नवीन जोमाने सुरू करणार आहे असे मत राज्याचे पर्यावरण राज्यमंत्री ना. संजय बनसोडे यांनी व्यक्त केले.
२६ जुलै रोजी कोरोनाची लागण झाली होती त्या दिवसापासून ते मुंबईतील एका खासगी दवाखान्यामध्ये उपचार घेत होते या काळातील आपला अनुभव त्यांनी सांगितला आहे तसेच या वेळी सर्वांना आवाहन केले आहे की एखाद्याला कोरोनाचा संसर्ग झाला म्हणजे त्यांनी काय गुन्हा केलेला नाही त्या रुग्णाला अथवा त्याच्या कुटुंबाला मानसिक पाठबळ द्या ,फोनवर बोला, शक्य असेल तेवढी मदत करा, मला राष्ट्रवादीचे नेते खासदार आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, ससंदरत्न, खासदार सौ. सुप्रियाताई सुळे, यांनी मानसिक पाठबळ दिले. या काळातही नेते जनतेच्या सेवेत फिरत आहेत.
खा. आदरणीय पवार साहेब या वयातही लोकांच्या भेटी घेऊन व राज्यातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी दौरे करून आढावा बैठका घेत आहेत.
पुढील तीन-चार दिवसांमध्ये मी माझ्या मतदारसंघातील विविध भागांना भेटी देऊन विकास कामाचा आढावा घेणार आहे.
या सोबतच राज्यातील माझ्या विभागातील विविध विकास कामे बैठकी द्वारे मार्गी लावणार आहे.
मागील दहा ते पंधरा दिवसापासून विकास कामासाठी वेळ देता आला नाही याची खंत त्यांनी बोलून दाखवली.
कोरोनाचा संसर्ग वाढला आहे प्रत्येकानी स्वतः ची व इतराची काळजी घ्यावी.याला न घाबरता शासनाने दिलेले आदेश तंतोतंत पाळण्यात यावे. भौतिक अंतर राखून आपले व्यवहार करावे या संकटाला आपण सर्वजण मिळून हरवुया असे मत यावेळी पर्यावरण, पाणीपुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम, रोजगार हमी, संसदीय कार्य, भुकंप व पुनर्वसन राज्यमंत्री ना. संजय बनसोडे यांनी व्यक्त केले आहे.