लाभार्थ्यांची बांधकाम परवाना शुल्क माफी साठी


 


लातूर मनपा प्रमाणे देवणी नगरपंचायतीने प्रधानमंत्री आवास योजना लाभार्थ्यांची बांधकाम परवाना शुल्क माफी साठी


 आरटीआय कार्यकर्ते श्री पांडुरंग रामराव कदम देवणी व अखिल सय्यद यांनी दिनांक03/02/2020 लोकशाहीतील लातूर येथे विविध मागण्या संदर्भात निवेदन सादर केले होते. दिनांक 19/02/2020 रोजी पत्र देऊनही मुख्याधिकारी देवनी काही कारवाई केली नाही. त्यानंतर कदम यांनी लातूर जिल्ह्यातील नगर विकास विभागाचे े अतिरिक्त आयुक्त माननीय सतीश शिवणे यांना विचारणा केली असता मागील दिलेल्या पत्रावर कारवाई न करणे वरिष्ठांच्या सूचना चे अनुपालन न करणे गंभीर दखल घेऊन अर्जावर अति तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिनांक.19/08/2020 मुख्याधिकारी देवणी यांना दिले


 थोडक्‍यात असे की.


लातूर महानगरपालिका मध्ये घरकुल धारकासाठी बांधकाम परवाना माफ केल्याची ठराव पास केले असून याच धर्तीवर देवणी नगरपंचायत ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजना रमाई आवास योजना या लाभ धारकासाठी कोणताही ठराव न घेता पंधरा ते वीस रुपये लादलेली फीस माफ करावी. पहिला हप्ता लाभधारकास विनाअट टाकावे. नगर परिषदेकडे जमा असल्याचं 510 रुपये घरकुल लाभधारकास परत करावे डीपीआर नंबर तीन प्रलंबित घरकुल यादी घेतल्याची मंजूर करावी. मार्क आउट टाकण्यासाठी 3000 ते 5000 लावलेली फिस रद्द करावी. बांधकाम नकाशा 1750 रुपये मध्ये मार्कट आऊट टाकावे. घरकुल लाभार्थी आर्थिक दुर्बल घटकातील असल्यामुळे शासन स्तरावर लाभ दिले जात असून नगराध्यक्ष मुख्याधिकारी भाजपशासित नगरपंचायतीने प्रधानमंत्री आवास योजना लाभधारकवर अन्याय करत असल्याचे निवेदनात नमूद केलेले आहे.


 लातूर जिल्ह्याचे अतिरिक्त आयुक्त माननीय सतीश शिवणे अति तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश वरील प्रमाणे दिलेले असून पुढील मुख्याधिकारी नगर पंचायत देवणी यांनी लोकशाही दिनातील तक्रारीची काय कारवाई करतील नूतन मुख्याधिकारी दखल घेतील काय. याकडे सर्व लाभधारकांची लक्ष लागलेले आहे. प्रस्तुत तक्रारी* अर्जावर आरटीआय कार्यकर्ते श्री पांडुरंग रामराव कदम व अखिल सय्यद ांच्या स्वाक्षर्‍या आहेत