कोरोनामुक्त झाले तरी शारीरीक क्षमता नसतानाही जनतेला वेळ देणारे राज्यमंत्री ना.संजय बनसोडे खरे कोरोना योध्दा-नवज्योत शिंदे
उदगीर(प्रतिनिधी)- उदगीर मतदारसंघाला बराच काळ उलटल्यानंतर माजी मंत्री बाळासाहेब जाधव यांच्यानंतर पहिला मंत्री मिळालेला. ना. संजय बनसोडे हे खरेच समाज सेवक व जनतेच्या कार्याची दखल घेेणारे नेते आहेत हे तर सर्वाना माहितच आहेत पण जनतेने निवडून दिल्यामुळे मतदारसंघातील प्रत्येकाचे काम करणे हे एकमेव ध्येय ठेवणारे म्हणजे राज्यमंत्री ना. संजय बनसोडे हे आहेत. कारण कोरोणा महामारीत न घाबरता मतदारसंघात धडाडीने फिरणारे व शासकीय कामकाजाची पाहणी करून रूग्णांना कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही सर्व सुविधा पुरेल याची दखल घेत जिल्ह्याचा दौरा करत होते. पण संजयभाऊंनाही कोरोना ने सोडले नाही व मुंबई येथे उपचारासाठी त्यांना १५ दिवस कोरोंटाईन व्हावे लागले. कोरोनामुक्त झाल्यानंतर लातूरला परतले पण मतदारसंघातील जनता व कार्यकर्ते त्यांना आराम करू देतील तर नवलच. त्यांच्या तब्येतेची विचारपूस करण्यासाठी, त्यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांचा व त्यांच्यावर प्रेम करणार्या जनतेची गर्दी ओसांडत असल्याची मी त्यांना निवास्स्थानी भेटण्यासाठी गेलो असता अनुभवलो. त्यांची शारीरक क्षमता नसतानाही कोरोनाचा नियम पाळत भेटण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांना दूरूच बोलने जास्ती जास्त सत्कार टाळणे व काय काम आहे? कोणाला सांगायचे आहे़? हा त्यांचा प्रश्न होता. तुमच्या सर्वांच्या आशिर्वादाने मी बरा झालो आहे. मी आता कोरोनामुक्त झालो असून जनतेच्या कामासाठी तत्पर आहे व आणखी जोमाने काम करने असं त्यांना भेटण्यासाठी येणार्या प्रत्येक कार्यकर्त्यांना व जनतेला संबोधत होते. त्यांच्याकडे पाहिल्यानंतर खरच वाटलं की सध्याच्या काळात कोरोना योध्दा कोणाला म्हणावे तर उदगीर मतदारसंघाचे आमदार तथा राज्याचे राज्यमंत्री संजय बनसोडे हेच योग्य ठरतील. माझ्या सोबत दै.एकजूट लोकजागृतीचे संपादक महादेव घोणे हे होते त्यांनी त्यांच्या कांही प्रश्नाचे उत्तर देऊन उदगीर मतदारसंघाचा कायापालट तर करणारच पण ज्या ज्या उणीवा व प्रलंबित विकास कामे आहेत ती पूर्ण करणार. सध्या उदगीर बस स्थानाकाचे बांधकाम थांबवण्यात आले असून लातूर जिल्ह्यातच नव्हे तर मराठवाड्यात पहावे असे भव्य बस स्थानक बांधण्यात येणार आहे यासाठी १५० कोटीचे नवीन निधी मंजूर केले असून यापूर्वी मंजूर केलेले ६ कोटीची निधी नगन्य होती. याच सोबत कलाममंदीर येथे भव्य असे १० कोटीचे मोठे नाट्य सभागृह होणार आहे अशी माहिती दिली. त्यांच्याकडील गर्दीचा ओघ पाहून मी थक्क झालो.ते सकाळापासून नाष्टा -जेवन न करता तसेच बसून होते. मी तर म्हणेन खरे कोरोना योध्दा कोण तर ना.संजयभाऊ बनसोडे