उडीद व सोयाबीन या पिकाचे पंचनामे करून तात्काळ आर्थिक मदत द्यावी- आ.जवळगावकर यांची कृषिमंत्री भुसे यांच्याकडे मागणी.
हदगाव( तालुका प्रतिनिधी) मागील पंधरा दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे सोयाबीन व उडीद या पिकाचे अतोनात नुकसान झाले असून परिणामी शेतकरी हतबल झाला आहे त्यामुळे या पिकाचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी कृषी मंत्री नामदार दादाजी भुसे यांच्याकडे केली आहे. मागील काही दिवसापासून हदगाव हिमायतनगर शहरासह परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असून या सततच्या पावसामुळे बऱ्यापैकी हाताला आलेली सोयाबीन व उडीद पिकावर रोगांचा प्रादुर्भाव वाढला त्यामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले त्यामुळे हाताला आलेल्या पिकाची परिस्थिती पाहता शेतकरी नुसता हतबल झाला त्यामुळे तो आर्थिक कोंडीत सापडला असून त्यांना मदत करणे हे शासनाचे कर्तव्य असून प्रशासनाला तात्काळ पंचनामा करण्याचे आदेशित करावे अशीही मागणी जवळगावकर यांच्याकडून कृषिमंत्री यांच्याकडे करण्यात आली आहे. सोयाबीन कंपनीने शेतकऱ्यांना सुरुवातीला न उगवणार्या बॅगा विक्री केल्या त्यामुळे शेतकऱ्यांना कुठे दुबार पेरणी तर काही ठिकाणी तिबार पेरणीचे संकट आले होते त्या परिस्थितीत व्यापाऱ्यांनीही शेतकऱ्यांना बॅगा बदलून दिल्या नाहीत त्यामुळे यावर्षीच्या उत्पादनात शेतकरी नुकसानीत आहे त्यातच पिकावर रोगांचा वाढलेला प्रादुर्भाव त्यामुळे अजूनही ही शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे अशा परिस्थितीत शासनाने शेतकऱ्यांच्या मदतीला धावून येणे गरजेचे असून शासनस्तरावरून हदगाव हिमायतनगर तालुक्यातील सोयाबीन उडीद पिकाचे पंचनामे करण्यासंदर्भात तालुका प्रशासनाला आदेशित करावे अशीही मागणी राज्याचे कृषिमंत्री नामदार दादाजी भुसे यांच्याकडे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी केली असल्याने शेतकर्यात समाधान व्यक्त होत आहे. मागील काही दिवसांपूर्वी हादगाव तालुक्यातील सहा गावांना शासनाकडून मिळणारे दुष्काळी अनुदान प्राप्त झाले नव्हते ही बाब आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या लक्षात येता च त्यांनी शासनस्तरावर प्रयत्न करून हादगाव तालुक्यातील सहा गावातील शेतकऱ्यांना चार कोटी 16 लाख रुपये अनुदान मंजूर करून दिले आणि ते अनुदान तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे तहसीलदार यांना सूचना केल्या होत्या आमदार जवळगावकर यांच्या तत्परतेने ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली त्यामुळे शेतकऱ्यांत त्यादरम्यान समाधानही व्यक्त करण्यात आले होते त्यामुळे या पिकाची नुकसान भरपाई मिळावी या अपेक्षित शेतकरी बांधव असताना दिसून येत आहेत. चौकट= लवकरच कृषी मंत्र्याची घेणार भेट.- आमदार जवळगावकर. हदगाव हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हाताला सोयाबीन व व उडीद हे पिके आली असतानाच पुन्हा एकदा निसर्गाने अवकृपा दाखवली आहे त्यामुळे सतत च्या होणाऱ्या पावसामुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढला परिणामी शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी यासाठी कृषी मंत्री नामदार भुसे यांना निवेदनाद्वारे मागणी केली असून यासंदर्भात लवकरच मतदारसंघातील पिकांचा अहवाल घेऊन कृषिमंत्री दादाजी भुसे यांची भेट घेणार असल्याचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी बोलताना सांगितले.