संततधार पावसामुळे पिकांचे नुकसान,तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची कृषी मंत्र्यांकडे केली जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे यांची मागणी
जिल्हाधिकारी यांनी तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत
लातूर प्रतिनिधी -
चालू खरीप हंगामामध्ये सुरुवातीला चांगला पाऊस झाला त्यानंतर शेतकर्यांनी पेरणी केली परंतु निकृष्ट बियाण्यांमुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले होते अशा मधे बर्याच जणांनी दुबार पेरणी केली त्यानंतर चांगला पाऊस झाला पिके जोमाने बहरत असताना सोयाबीन, उडीद, मूग आदी पिकेही चांगली जोमात आली होती, मात्र ढगाळ वातावरण आणि दिवसभर पडणाऱ्या रिमझिम पावसा मुळे हे पीक धोक्यात आले आहे. रिमझिम पावसाने पिके पिवळी पडत आहेत. पानावर, शेंगांवर आळी, किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. वातावरणातील आर्द्रता अधिक असल्याने हाताशी आलेले मूग वाया गेले आहेत. शेतात चिखल असून सततच्या पावसाने मूग काढताही येत नाही परिणामी शेतकऱ्यांची खूप मोठी अडचण झाली आहे,
सततच्या पावसामुळे मुगांवर कोंब फुटले आहेत त्यातून शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडली आहे यंदाच्या हंगामात किमान लागवड खर्चही निघाला नाही आधीच दुबार पेरणी झालेल्या शेतकऱ्यांना मुगानेही दगा दिला आहे.
अशा या कठीण परिस्थितीमध्ये तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून आर्थिक मदत तात्काळ करण्यात यावी तसेच पीक विमा मंजूर करण्यात यावा अशी मागणी कृषी मंत्री मा. ना. श्री. दादा भुसे., तसेच लातूर जिल्हाधिकारी यांच्याकडे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी केली आहे.