*कसलीही फीस न घेता विध्यार्थ्यांना टी सी चे वितरण करावे* - सुशीलकुमार शिंदे
उदगीर :- दहावी व बारावी या वर्गाचा निकाल काही दिवसांपूर्वी जाहीर झाला असून उत्तीर्ण विध्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश घेण्यासाठी टी सी ची आवश्यकता असते ते टी सी देण्यासाठी शाळा व महाविद्यालय 200 ते 1000 रुपये फीस आकारत आहेत तरी कसलीही फीस न घेता विध्यार्थ्यांना टी. सी. चे वितरण करावे अशी मागणी रि.पा.इं. (आ) युवक आघाडीचे युवा नेते सुशीलकुमार शिंदे यांनी केली आहे
गेल्या 5महिन्यापासून देशावर कोरोना महामारीचे संकट असून गेली 3 महिने व्यापार बंद आहेत, कर्मचाऱ्यांच्या पगारात 25 टक्के कपात केली जात आहे मजुरांच्या हाताला काम नाही अशा परिस्थितीत सर्व समाज आपले जीवन जगत असताना शाळा व महाविद्यालय दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या विध्यार्थ्यांना/ पालकांना शाळा सोडल्याचा दाखला देण्यासाठी 200 ते 1000 रुपये फीस भरण्याची मागणी करत असून अगोदरच कोरोनामुळे आर्थिक अडचणीत असणाऱ्या पालकांना याची मोठी झळ सहन करावी लागणार आहे तरी टी सी देण्यासाठी कसलीही फीस न आकारता विध्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला देण्यात यावे अशी मागणी सुशीलकुमार शिंदे यांनी केली आहे