ताज्या घडामोडीसाठी Ekjut Lokjagrati Youtube channel पहा


1) उदगीरसाठी स्वतंत्र कोवीड१९ तपासणी प्रयोगशाळेचा


प्रस्ताव दयावा, शासन तात्काळ मंजूरी देइल


 



                                                                                        कोवीड१९ प्रादूर्भावावर नियंत्रण मिळवीण्यासाठी शोधा, तपासा आणि उपचार करा ही मोहिम प्रभावीपणे राबवा, मृत्युदर कमी करून रूग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढवण्यावर भर दया, तसेच रूग्णाची तपासणी जलद गतीने करावी असे निर्देश देऊन उदगीर येथे कोवीड१९ विषाणु तपासणी प्रयोगशाळा उभारणीचा प्रस्ताव त्वरीत सादर करावा त्यास शासनाची लगेच मंजूरी मिळवुन देता येईल असे आश्वासनही उदगीर येथील आढावा बैठकी दरम्यान दिले.


रवीवार दि. १६ ऑगस्ट रोजी उदगीर येथे जाऊन उदगीर शहर व तालुका परीसरातील कोविड१९ प्रादूर्भावावर नियंत्रण मिळवीण्यासाठी शासनाच्या वतीने राबवीण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला.


उदगीर येथील पशुवैद्यकीय रुग्णालयाच्या सभागृहात आयोजित या आढावा बैठकीस जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, अप्पर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, उपविभागीय पोलिस अधिकारी मधुकर जवळकर, तहसीलदार वेंकटेश मुंडे, मुख्याधिकारी भारत राठोड, बसवराज पाटील नागराळकर, कल्याण पाटील व राजेश्वर निटुरे आदि उपस्थित होते.


2) लाईफ केअर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर उदगीर येथून कोरोना बाधित १०२ वर्षाच्या महिलेने कोरोनावर केलेली मात ही अभिमानस्पद असल्याचे नगर पालिकेचे मुख्याधिकारी भारत राठोड यानी सांगितले.


3) डीवायएसपी सचिन सांगळे यांच्या निलंबनासाठी निदर्शने,आदोलकांवर गुन्हा दाखल


लातूर,दि.१७ः साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीदिनीअभिवादनासाठी गेलेल्या शहरातील पत्रकार व कार्यकर्त्यांशी लातूर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे यांनी अटकाव केल्याने त्यांना निलंबीत करावे,संपादक रघुनाथ बनसोडे यांना अपमानीत केल्याबद्दल त्यंाच्यावर ऍट्रॉसिटीखाली गुन्हा दाखल करावा,त्यांच्या इथल्या आजपर्यतच्या कारभाराची खातेनिहाय चौकशी करावी आदी मागण्यांसाठी सोमवार,दि.१७ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता अण्णा भाऊ साठे चौकात शारिरीक अंतर पाळून निदर्शने करण्यात आली.त्यामुळे विविध पक्ष,संघटनांच्या पदाधिकारी,कार्यकर्ते,नागरिकांना गांधी चौक पोलिसांनी अटक करुन,गुन्हा दाखल करुन सोडून दिले.3)