आदिवासींच्या जमिन हस्तातरण प्रक्रियेस हदगाव तहसील चे उदासीन धोरण

आदिवासींच्या जमिन हस्तातरण प्रक्रियेस हदगाव तहसील चे उदासीन धोरण



     हदगाव तालुका प्रतिनिधी:- महाराष्ट्र शासनाच्या 1950 नंतरच्या काळातील आदिवासी लोकांच्या जमिनी इतर कोणत्याही व्यक्तीस घेता येणार नाही असे सक्त आदेश शासनाने दिले होते परंतु काही अपवाद वगळता फक्त आणि फक्त एका आदिवासी बांधवांची जमीन दुसरा आदिवासी बांधव नात्यातला खरेदी करू शकतो तो पण आदिवासी कायदा म. ज. म. अधिनियम 1966 चे कलम 36(2) अन्वये शेत जमीन 


हस्तातरण करण्याची प्रक्रिया मा. जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड यांच्या पूर्व परवानगी घेऊन करता येते. परंतु यास हदगाव तहसील कार्यालयात उदासीन धोरणामुळे आदिवासी बांधवांची फरपट होताना दिसते. गेल्या दोन ते चार वर्षांपासून अनेक प्रकरणे प्रलंबित ठेवले आहेत. नांदेड च्या जिल्हाधिकारी कार्यालयातून अहवाल सादर करण्याचे निर्देश येतात पण त्यास उदासीन कर्मचारी आणि वेळकाढूपणा करणारे आधिकारी यामुळे तालुक्यातील सर्वसामान्य माणूस त्रासून गेला आहे. मारझळा, नाव्हा ,चोरंबा, खरबी, केदारगुडा, सावरगाव माळ, धन्याचीवाडी, डाक्याचीवाडी,निमटोक, तरोडा, कार्ला, मनाठा सर्कल आदी गावात दोन ते तीन प्रकरणे प्रलंबित पहावयास मिळतील यात शंका नाही. असेच मौजे मारझळा येथील सावित्रीबार्इं लक्ष्मण खोकले, पुंजाजी बापूराव नाईक या दोघांचे प्रकरण गत तीन वर्षांपासून प्रलंबित ठेवले आहे. कधी कार्यालयातील लिपिक चुकीचे पत्र पाठवून पुन्हा सुधारणा करण्याच्या नावाखाली सहा महिने ते एक वर्ष घालतो तर कधी इतर शुल्लक कारणावरून जिल्हाधिकारी कार्यालय ते तहसील कार्यालय आणि परत एस. डी. ओ. कार्यालय सारखा फेऱ्या मारून बेजार झाले आहेत. कधी जिल्हाधिकारी कार्यालयात काम करणारा वरिष्ठ लिपिक, तलाठी, मंडळ निरीक्षक, तहसील कार्यालयात काम करणारा लिपिक असो की कोतवाल यांच्या सर्वांच्या ढिसाळ नियोजनामुळे आदिवासी बांधवांना नाहक त्रास देण्याचा प्रशासनास परवाना मिळाला की काय...? अशी शंका सर्वसामान्य लोकांच्या मनात येऊ लागली आहे.जर याबाबतीत हदगाव तहसील कार्यालय यांनी सकारात्मक भूमिका घेत आदिवासी बांधवांची जमीन 


हस्तातरांची प्रक्रिया जलद गतीने मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावे अन्यथा समस्त समाज बांधवांकडून लोकशाही मार्गाने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा यावेळी पंचायत समितीचे उपसभापती शंकरराव मेंडके अांध आदिवासी समाज संघटनाचे हदगाव तालुका अध्यक्ष एड.रामदासजी डवरे यांनी दिला आहे. प्रतिनिधी अशोक गायकवाड हदगाव