247 मोहोळ विधानसभा अनुसूचित जाती मतदार संघाचाआढावा


247 मोहोळ विधानसभा अनुसूचित जाती मतदार संघाचाआढावा घेण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी आज भारतीय जनता पार्टी मोहोळ तालुका कार्यालयाला धावती भेट दिली. मोहोळ अनुसूचित जाती मतदारसंघातील जनतेच्या अडीअडचणी व भाजपा पक्षबांधणी संदर्भात त्यांनी पदाधिकार्‍यांशी चर्चा केली यावेळी पदाधिकाऱ्यांशी चर्चा झाल्यानंतर भविष्यकाळात हा मतदारसंघ भाजपला खेचून आणण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी ताकतीने कामाला लागलं पाहिजे जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी या मतदारसंघाकडे मी स्वतः जातीने लक्ष देईन अशी ग्वाही पदाधिकाऱ्यांशी बोलताना त्यांनी यावेळी दिले यावेळी तालुका अध्यक्ष सतीश आप्पा काळे यांनी नूतन प्रदेश अध्यक्ष माजी आमदार सुधाकर भालेराव यांचा सत्कार केला यावेळी उपस्थित भाजप तालुका अध्यक्ष सरचिटणीस एडवोकेट हेमंत शिंदे अजय कुर्डे युवा मोर्चा तालुका अध्यक्ष अजय कुरडे भाजपा सोशल मीडिया चे तालुकाध्यक्ष अजय गावडे ज्येष्ठ मार्गदर्शक विठ्ठल माने माजी तालुकाध्यक्ष अरविंद माने दत्तात्रय कारंजकर ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष महेश शेंडगे भाजप कार्यकर्ता संजीव खिलारे आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते