शिवाजी महाविद्यालयात नवीन शैक्षणिक धोरण 2020 वर राष्ट्रीय वेबिनार चे आयोजन 

शिवाजी महाविद्यालयात नवीन शैक्षणिक धोरण 2020 वर राष्ट्रीय वेबिनार चे आयोजन 


 


उदगीर -शिवाजी महाविद्यालयात 5 ऑगस्ट 2020 रोजी नवीन शैक्षणिक धोरण 2020 या विषयावरील एक दिवसीय राष्ट्रीय स्तरावरील वेबिनारचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदरील वेबिनार तीन सत्रांमध्ये ठेवण्यात आलेला आहे. पहिले सत्र उद्घाटन व विषयाची मुख्य कल्पना यावरील असेल. या सत्राचे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष प्रा.विजयकुमार पाटील शिरोळकर, प्रमुख वक्ते प्रा.डॉ. लवांडे एस.पी. जनरल सेक्युरिटी मुफ्टो हे असणार आहेत. या वेळी प्रमुख उपस्थिती संस्थेचे सचिव मा.ज्ञानदेव झोडगे, मॅनेजमेंट कौन्सिल स्वरातीम नांदेड चे सदस्य डॉ. दीपक बच्चेवार,स्वामुक्टाचे जनरल सेक्रेटरी डॉ.सूर्यकांत जोगदंड,सिनेट सदस्य डॉ. मोरे डी.एन., सोलापूर येथील भाषा व साहित्य संकुलातील प्रभारी डायरेक्टर डॉ. कोलेकर प्रभाकर,प्राचार्य डॉ.विनायकराव जाधव यांची असणार आहे.दुसऱ्या सत्रामध्ये डॉ.मोरे डी.एन.व डॉ.कोलेकर प्रभाकर हे वरील विषयावर सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत.तिसऱ्या सत्रामध्ये मार्गदर्शन व सहभागी सोबत चर्चा असणार आहे. या सत्राचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.विनायकराव जाधव तर प्रमुख मार्गदर्शक डॉ.लवांडे एस. पी.,डॉ. बच्चेवार दीपक ,डॉ.जोगदंड सूर्यकांत,डॉ. डी.एन.मोरे,डॉ. कोलेकर प्रभाकर हे असणार आहेत.या झूम द्वारे ऑनलाईन राष्ट्रीय स्तरावरील वेबिनार मध्ये जास्तीत जास्त जनांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन प्राचार्य डॉ. विनायकराव जाधव ,संयोजक तथा उपप्राचार्य डॉ.आर.एम.मांजरे ,समन्वयक ग्रंथपाल तथा आयक्वेशी सेलचे प्रमुख प्रा.व्ही.एम. पवार यांनी केले आहे.