शेतकऱ्यांना अर्ज ५ ऑगस्ट 2020 पर्यंतच भरता येणार
पंतप्रधान किसान सन्मान योजने अंतर्गत लाभ मिळत नसलेल्या शेतकरी यांना लाभ मिळणेसाठीचा अर्ज ५ ऑगस्ट 2020 पर्यंतच भरता येणार आहेत
शेतकऱ्यांना आर्थिक मदत रू.2000=00 प्रमाणे तिन हप्त्यामधे *वार्षिक रू.6000=00 होत आहे.* राज्यात अनेक शेतकरी आहेत ज्यांना या योजनेचा अजून लाभ मिळालेला नाही. *अशा शेतक-यासाठी विशेष मोहिम राबवण्यात येत आहे.*
आता सरसकट सर्व शेतकर्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार असल्याने लाभार्थी शेतकर्यांनी नोंदणी त्वरेने करावी.
ज्या शेतक-यांना या योजनेचा अर्ज भरता आला नाही अगर अर्ज भरताना झालेल्या चुकामुळे या योजनेचा लाभ घेता आला नाही अशा शेतक-यांनी *आपल्या क्षेत्रातील संबंधित कृषी अधिकारी,कृषी सहाय्यक* यांचे कडे अर्ज करावा. त्यांचे मार्फत महसुल यंत्रणेशी समन्वय साधत योजनेर्गत शेतक-यांच्या कागदपत्रातील त्रुटी दूर करुन महसुली नोंदीच्या आधारे वाढीव लाभार्थ्यांची नोंद करून त्यांची पीएम किसान पोर्टलशी जोडणी करण्यात येणार आहे.
*शेतक-यांना या योजनेसाठी खालील पेपर्स झेराॅक्स द्यावेत.*
*( 1) आधार कार्ड*
*(2)बॅंक पासबुक त्यावर बॅंकेचा IFSC कोड असला पाहीजे जुने पासबुक वर IFSC नसेल तर आपल्या जवळील किंवा वाडीतील त्याच बॅंक व शाखेतील दुसरा व्यक्तींच्या बॅंक पासबुक वरील IFCS असेल तर तो झेराॅक्स वर हाताने लिहावा व खाते नंबर अस्पष्ट असेल तर तो बाजूला स्पष्ट लिहावा.(याच चुकांमुळे काही शेतकरी यांना हा लाभ मिळाला नाही)*
*(3) ७/१२ व ,८अ ऑनलाईन उतारा.*
( *4) आपला फोन नंबर. नसेल तर घरातील कोणाचाही द्यावा.*
या योजनेचा लाभ ज्या पात्र असूनही शेतक-यांना मिळालेला नाही किंवा शेतक-यांनी रजिस्ट्रेशन केलेले नाही. *त्यांनी 5 ऑगस्ट 2020पर्यंत करावे.*
डॉ.सुनील ना.भावसार
(प्रवक्ता- महाराष्ट्र राज्य
प्रधानमंत्री जनकल्याणकारी योजना प्रचार प्रसार अभियान)