स्व. विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतीदिनानिमित्त  10 युवकांचे स्वंय स्फूर्तीने प्लाझ्मा दान 

स्व. विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतीदिनानिमित्त 


10 युवकांचे स्वंय स्फूर्तीने प्लाझ्मा दान 



लातूर,दि.14(जिमाका) स्व. विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतीदिनानिमित्त विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था लातूर येथे कोवीड १९ प्लाझ्मा दान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हयातील अहमदपूर येथील- ६, सारोळा -२, उदगीर- १, व लातूर येथील -१ अशा एकूण १० युवकांनी स्वंय स्फूर्तीने प्लाझ्मा दान करून कोवीड १९ अतिगंभीर रुग्णांना आशेचा किरण मिळवून दिला.


प्लाझ्मा दात्यांना कसलाही धोका होत नाही ज्या पद्धतीने आपण रक्तदान करतो त्याही पेक्षा सोपी पद्धत प्लाझ्मा दानाची आहे. त्यामुळे आतापर्यंत प्लाझमा दान केलेल्या कोविड योद्धय़ांना कसलाही त्रास झाला नाही. आज तागायत विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था लातूर येथे १३ दात्यांनी स्वयंस्फूर्तीने प्लाझ्मा दान केले असून प्लाझ्मा दाते स्वच्छेने पुढे येऊन सामाजिक बांधिलकी ओळखून मोठ्या प्रमाणात प्लाझ्मा दान करण्यास दात्यांचे सहकार्य मिळत आहे. 


मी आता कोरोना आजारातून बरा झालो आहे आणि पुन्हा काही तरी होईल अशा भीतीपोटी न राहता कोविड १९ आजारातून बरे झालेल्या दात्यांनी स्वतःहून प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे यावे त्यामुळे अति गंभीर व मध्यम प्रकारची लक्षणे असणाऱ्या कोरोना बाधित रुग्णांना जीवदान मिळण्यास मदत होईल असे आवाहन महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. मोहन डोईबळे यांनी केले .


या वेळी उपअधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर.उपअधिष्ठाता डॉ. उदय मोहिते उप अधिष्ठाता जनसंपर्क, वैद्यकीय अधीक्षक डॉ संतोषकुमार डोपे, कोरोना नोडल ऑफिसर डॉ. मारुती कराळे, डॉ. उमेश कानडे, सुरेश चौरे रक्तपेढी प्रमुख डॉ. के. टी. दळवे, डाँ. अजय ओव्हाळ, डॉ. अनिल मुंडे, डॉ. आशिष चेपुरे, मनोविकारशास्त्र प्रमुख डॉ. पवार, डॉ. दीप्ती सोनवणे, प्रशासकीय अधिकारी मगर यांची उपस्थिती होती .


कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुरेंद्र सूर्यवंशी समाजसेवा अधीक्षक श्रीमती मीरा पाटील गिरीश मुसांडे. तिडके स्वामी यांनी परिश्रम घेतले.


 


                                            ****