दुधाला सरसकट १० रु. / लिटर अनुदान व दुध पावडरला प्रती किलो ५० रु. अनुदान द्यावे-सुधाकरजी भालेराव
महाविकास आघाडी सरकार कडून दुधाच्या दरात करण्यात आलेली कपात ही अन्यायकारक असल्याचा दावा करीत भाजपाचे विरोधी पक्षनेते श्री. देवेंद्रजी फडणवीस व प्रदेशाध्यक्ष श्री. चंद्रकांतदादा पाटील यांच्या आवाहनानुसार वाशी येथील वारणा चौकात दुधाचे टँकर अडवून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सदर आंदोलनात भाजप अ.जा.मोर्चा प्रदेश अध्यक्ष मा.आमदार डॉ सुधाकरजी भालेराव यांनीअशा परिस्थितीत दुधाला सरसकट १० रु. / लिटर अनुदान व दुध पावडरला प्रती किलो ५० रु. अनुदान द्यावे, त्या बरोबरच वाढीव दराने देण्यात आलेली वीज बिले रद्द करण्यात यावीत, अशी मागणी केली सदर आंदोलन प्रसंगी नवी मुंबई जिल्हाध्यक्ष श्री. रामचंद्रजी घरत, माजी महापौर श्री. सागरजी नाईक व जिल्हा महामंत्री श्री. सतीशजी निकम कृष्णाजी पाटील प्रदेश कार्यालय सचिव श्री सुरेश गायकवाड अ जा मोर्चा अध्यक्ष विकास सोरटे युवा मोर्चा अध्यक्ष दत्ता घंगाळे महिला अध्यक्ष सौ. दुर्गा डोक विजया ताई घरत इ.पदाधिकारी उपस्थित होते.