उदगीर येथील दोन दिवसात स्वॅबचे 04 तर रॅपीड 17 एकूण 21 पॉझेटिव्ह 

उदगीर येथील दोन दिवसात स्वॅबचे 04 तर रॅपीड 17 एकूण 21 पॉझेटिव्ह 



उदगीर :- दि. 04 ऑगस्टला येथुन स्वॅब पाठवण्यात आले होते त्यापैकी उदगीर 03 व देवणी 01 असे 04 पॉझेटिव्ह रुग्ण आले त्यात उदगीर शहरातील बिदर रोड 01, व्यंकटेश नगर 01, चिल्लरगे गल्ली 01 व देवणी 01 तर रॅपिड टेस्ट मध्ये 08 जण पॉझिटिव्ह निघाले आहेत त्यात शाहू कॉलनी 05 , शेकापूर 02, अशोक नगर 01 असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक यांनी माहिती कार्यालयाकडून प्रसिद्ध केलेल्या पत्रकात दिली आहे. 


तर उदगीर दि. 05 येथे रॅपीड टेस्ट मध्ये उदगीर 15 व देवणी 02 असे 17 पॉझेटिव्ह आले असून त्यांचे परीसर येणे बाकी आहे.


. 


विशेष दिनांक 4 ऑगस्ट रोजी उदगीर मार्केट यार्ड मधील दुकानदार यांची antigen टेस्ट कॅम्प जागृती चित्रपटगृह उदगीर या ठिकाणी मा अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद्र लोखंडे व उप. वि. अ. प्रविण मेंगशेट्टी यांच्या उपस्थितीत सुरु करण्यात आले आहे .काल चे 50 पैकी पूर्ण टेस्ट negative असुन आज दि.05 ऑगस्टचे 50 पैकीं केवळ 01 पोसिटीव्ह आलेला आहे .


उदगीर कोविड येथे आत्तापर्यंत 476 पॉझेटिव्ह रुग्ण आढळले असून 236 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. 44 घरी उपचार घेत आहेत व कोवीड हॉस्पिटल येथे 61 तर तोंडार पाटी येथे 47 असे एकूण 144 जण उपचार घेत आहेत. आत्तापर्यंत 52 रुग्णांना बाहेर पाठवण्यात आले आहे 30 रुग्णाचे मृत्यू झाले आहे.