सामाजिक उपक्रमाने युवा नेत्या प्रिती चंद्रशेखर भोसले यांचा वाढदिवस साजरा
उदगीर (प्रतिनिधी) उदगीर विधानसभा मतदार संघाचे भाग्यविधाते माजी आमदार स्व. चंद्रशेखर भोसले यांची कन्या प्रिती चंद्रशेखर भोसले यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धनाचा संकल्प याप्रसंगी युवकांनी सोडला. बिदर रोड वरील रामेश्वर बिरादार यांच्या ओम मार्बल्स अॅन्ड ग्रॅनाईट दुकानासमोर वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी सुनील सावळे, उदय मुंडकर, रामेश्वर बिरादार जकनाळकर, शशिकांत बनसोडे, एल. पी. उगिले, विनोद मिंचे,पोलिस रिपोर्टरचे संपादक सुरेश बोडके, सतीश पाटील मानकीकर, राम मोरे शेल्हाळकर, धनाजी मुळे! संजय सोलापूर, संजय तुळजापूर, पंकज कांबळे, रावसाहेब भालेराव, शरद पाटील, सर्जेराव भांगे, कमलाकर फुले, पंकज कालानी, भीम मुंगे, गणपतराव गादगे,गणपत शेरे, श्री खतीब इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी पुढे बोलतांना रामेश्वर बिराजदार यांनी स्पष्ट केले की, सामाजिक जाण आणि विकासाची दृष्टी असलेले नेते स्व. चंद्रशेखर भोसले यांचा वसा आणि वारसा चालवण्यासाठी व सामाजिक जाणीवा जपण्यासाठी प्रीती भोसले या राजकारणात आणि समाजकारणात सक्रिय होत आहेत. साहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून गोरगरिबांना सहकार्य आणि सामाजिक उपक्रम राबवण्यामध्ये चंद्रशेखर भोसले प्रतिष्ठानच्यावतीने वर्षभर वेगवेगळे कार्यक्रम राबवण्यात येत आहेत. भविष्यातही समाजकारणासाठी सर्व टीम कार्यरत राहील. असा विश्वासही याप्रसंगी रामेश्वर बिरादार यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शरद पाटील यांनी केले.