रक्तदान ही काळाची गरज - उपजत्ल्हाधिकारी मेंगशेट्टी
उदगीर - सध्याच्या परिस्थितीत सामाजिक जाणिवा जपण्यासाठी कोरोना विषाणूचा संसर्गाच्या संदर्भाने रक्तदान शिबिरांचे आयोजन ही काळाची गरज बनली आहे. असे विचार उदगीरचे उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी यांनी व्यक्त केले. तेविकास नगर येथे श्रीकांत पाटील यांच्या चंदरआण्णा प्रतिष्ठानच्या वतीने सिध्देश्वर (मुन्ना) पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित रक्तदान शिबिरात उद्घाटन प्रसंगी बोलत होते. या शिबिरामध्ये 53 लोकांनी रक्तदान केले.
सामाजिक बांधिलकी जपत कोरोना काळातही अनेक उपक्रमाच्या माध्यमातून सोशल डिस्टन्सिंग राखण्यासंदर्भात या कार्यक्रमाचे आयोजक श्रीकांत पाटील यांच्या मार्फत नागरिकांना कोरोना काळातही कशी दक्षता घ्यावी? या विषयावर माहिती दिली जात आहे. या रक्तदान शिबिरात तरुणांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग असून शहरातील तरुण वर्ग मोठ्या संख्येने रक्तदान करीत आहेत.
विकास नगर येथे श्रीकांत पाटील यांच्या चंदरआण्णा प्रतिष्ठानच्या वतीने उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा मलकापूर ग्रामपंचायतीचे उपसरपंच सिध्देश्वर (मुन्ना) पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदान शिबिर आयोजित केले होते, यामध्ये 53 लोकांनी रक्तदान केले. यावेळी उदगीरचे उपविभागीय अधिकारी प्रविण मेग्शेटटी, उदगीर नगर परिषदेचे मुख्याधिकारी भारत राठोड, तहसीलदार व्यंकटेश मुंडे पोलीस उपनिरीक्षक गजानन पाटिल, सहकारमहर्षी.चंदरआण्णा वैजापुरे, उद्योगपती सूर्यकांत मुक्कावार, माजी नगराध्यक्षा उषाताई सोनकाबळे,माजी उपाध्यक्ष शिवराज पाटील, मनोहर आडे, पत्रकार रामभाऊ मोतिपवळे, सुभाष धनुरे, बाबुरावसमगे,राजकुमार बिरादार बामनीकर, प्रा.गुंडप्पा पटणे,युवानेते महात्मा गांधी अर्बन बॅंकेचे उपाध्यक्ष चेतन वैजापुरे श्री रत्नगंगा केमिस्ट्री क्लासेसचे संचालक प्रा.प्रदिप विरकपाळे, पी.टी.ए चे तालुकाध्यक्ष प्रा.सिध्देश्वर पटणे, रमाकांत चटनाळे,साईनाथ चिमेगावे, शिवम चणगे,नवनाथ गायकवाड, मलकापूरचे राहूल पाटिल,राजकुमार रमेश खंडोमल्के,कपिल शेटकार,सुनिल पाटिल,तानाजी पाटील,सोमनाथ पाटील, सचिन वाघमारे, नंदकुमार पटणे, विशाल हाळीकर व स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
पुढे बोलताना प्रवीण मेंगशेट्टी यांनी स्पष्ट केले की, समाजामध्ये एक दुसऱ्याबद्दल जिव्हाळा निर्माण करून राष्ट्रीय एकात्मता आणि आपण या समाजाचे काही देणे लागतो. याची जाणीव निर्माण करून देणारा हा कार्यक्रम आहे. रक्तदानामुळे गरजूंचे प्राण आपण वाचू शकतो. आपल्यामुळे कोणाचा जीव वाचला, हि एक समाधानाची बाब आहे. रक्तदाना मध्ये तरुणवर्गाने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असेही आवाहन याप्रसंगी त्यांनी केले.
या कार्यक्रमाचे संयोजक श्रीकांत पाटील यांनी सांगितले की, उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सिद्धेश्वर उर्फ मुन्ना पाटील हे सामाजिक जाणीव जपणारे नेते आहेत. त्यामुळे त्यांचा वाढदिवस देखील सामाजिक उपक्रमांनी साजरा करावा. या भावनेने आम्ही हा उपक्रम हाती घेतला आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी टी ए चे तालुका अध्यक्ष तथा इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसचे संचालक प्राध्यापक सिद्धेश्वर पटणे यांनी केले. तर केमिस्ट्री किंग प्राध्यापक प्रदीप वीरकपाळे यांनी आभार प्रदर्शन केले.