उदगीर ला मिळाला मानाचा तुरा

उदगीर ला मिळाला मानाचा तुरा


पहिल राफेल विमान उडवणारा विद्या वर्धिनी इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी



उदगीर/प्रतिनिधी


किसान शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचलित विद्यावर्धिनी इंग्लिश स्कूल चा विद्यार्थी चिरंजीव सौरभ अंबूरेला पहिलं राफेल विमान उडवण्याचा मान मिळाल्यामुळे उदगीर च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. नुकतेच वायुसेनेने फोटो शेअर केले असून सौरभ अंबूरे हा राफेल विमान सोबत दिसत आहे. शत्रूला धडकी भरवणाऱ्या राफेल मध्ये बसून अंबुरे यांनी जुलै महिन्यातच पहिल्यांदा झेप घेतली. सौरभ याने फ्रान्सम मध्ये राफेल विमानातून गगन भरारी घेत पाहिले राफेल विमान उडवीले. सौरभच्या या गगन भरारी बद्दल किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा.विजयकुमार पाटील शिरोळकर, उपाध्यक्ष अशोकराव पाटील, सचिव ज्ञानदेव झोडगे, सह सचिव रावसाहेब देशमुख,कोषाध्यक्ष श्री रंगराव पाटील, विद्या वर्धिनी इंग्लिश स्कूलचे प्राचार्य व्ही.एस कणसे, मुख्याध्यापक एस.एन घोडके यांच्यासह शिक्षक,शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले असून सौरभचे मित्रपरिवारासह सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.