प्रशसानाच्या दुर्लक्षीत कारभारामुळेच शेतजमीनीच्या प्रकरणात खूनीहल्ले

प्रशसानाच्या दुर्लक्षीत कारभारामुळेच शेतजमीनीच्या प्रकरणात खूनीहल्ले


कुमदाळ येथे पुंडलीक व्यंकोने यांचा खुन



उदगीर(प्रतिनिधी)-तहसील,पोलिस प्रशासनाच्या दुर्लक्षीत कार्यामुळे ग्रामीण भागातील शेतजमीनीची प्रकरणे ही वेळेत मिटत नसल्यामुळे शेतजमीन मालकं एकमेकावर जीवघेणी हल्ले करत आहेत. ग्रामीण भागात शेतजीनीची जास्त तंटे वाढत असून धुर्‍यावरून भांडणे, शेतजमीनीच्या वाटणीची भांडे, अतिक्रमण केलेली भांडे हि तहसील,भूमीअभिलेख, पोलिस स्टेशन पर्यंत जात असतात पण प्रशासनातील अधिकारी व कर्मचार्‍यांच्या दुर्लक्षीत कारभार किंवा धनदांडगा, जवळचा नातेवाईक, जातीचा असल्यास प्रकरण प्रलंबित ठेवणे किंवा आर्थीक लाभापोटी आरोपीच्या बाजूने निकाल देणे व सर्वसामान्य शेतकर्‍यावर अन्याय करणे. कांहीवेळीत राजकीय नेते, कार्यकर्ते यात हस्तक्षेप करतात तर कधी  कधी लोकप्रतिनिधीमुळे हि प्रकरणे प्रलंबित पडतात व आरोपी अभय राहतो पण ज्यांच्यावर आन्याय झाला आहे त्यास पोलिस स्टेशन, तहसील कार्यालय, आमदार,खासदार, एस.पी.,आजी.,मुख्यमंत्र्यापर्यंत न्याय मागण्यासाठी धावपळ करावी लागते यामुळे आरोपीच्या बाजूने आर्जदारांना धमक्या, वेगवेगळ्या प्रकारचे त्रास दिले जाते यामुळे अशा प्रकरणामध्ये एखाद्याचा विनाकारण जीव जातो.
असाच प्रकार काल उदगीर तालुक्यात प्रकार घडला असून मौ.कुमदाळ येथील पुंडलिक विठोबा व्यंकोने वय वर्षे साठ राहणार कुमदाळ(गुरदाळ)  यांचा शेतात काम करत असताना मागील धुर्‍याच्या भांडणाची कुरापत काढुन गावातील ५ व्यंकतीने माझ्या वडीलास मारून टाकल्याची तक्रार त्याच्या मोठा मुलगा बालाजी व्यंकोने यांनी पोलीसांना जवाब दिला आहे. जो पर्यंत सर्व आरोपीना पकडणार नाही व  तसेच व्यंकाने(पान३वर) कुंटुबातील कमवता माणुस गेल्यामुळे ३ मुलांपैकी एकाला शासकीय नौकरी देण्याचे प्रशासन अशवासन देणार नाही तोपर्यत आम्ही अत्यं विधी करणार नाही असे सांगितले. पुढील तपास पी- एस आय डी.डी शिंगनबर, साळवे हे करीत आहेत. ग्रामीण पोलीस स्टेशन येथे इडी दाखल आरोपी आणखी मोकाटच.