लातुर जिल्ह्यात ६८ रुग्णांची भर उदगीरच्या तिघांचा मृत्यू
उदगीर/प्रतिनिधी
जिल्ह्यात कोरोनाचा प्रदुर्भांव वाढतच असुन दिवसेंदिवस रुग्णाच्या संख्येत वाढ होत आहे. दि. २० जुलै रोजी रात्री उशिरा आलेल्या अहवालात ३९४ व प्रलंबित २१६ स्वॉब मध्ये ६८ पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली असुन ५५ रुग्ण उपचाराने बरे झाल्यानंतर त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. काल सहा जनांचा मृत्यू झाला असुन आज दि. २१ जुलै रोजी उदगीरचे तिन जन दगावली आहेत.
जिल्ह्यात कोरोनाची साथ झपाट्याने वाढत असून जुलै महिण्यात सर्वाधिक रुग्ण सापडत आहेत. आजपर्यंत १२२७ पॉझिटिव्ह रुग्ण निघाले त्यांच्यावर उपचार केल्यानंतर ६३५ रुग्ण बरे होवून घरी गेले. तर आजघडीला ५५३ रुग्णांवर उपचार सुरु असुन उपचारादरम्यान ५९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. लॉकडाउनचा परिणाम कितपत झाला याचे अवलोकन पुढील दहा दिवसाच्या रुग्ण संख्येवरून दिसून येणार असले तरी सध्याची परिस्थिती चिंताजनक आहे. दि. २० जुलै रोजी तपासण्यात आलेल्या अहवालानुसार ६८ रुग्णांची भर पडली आहे. यात लातुर- ३५, औसा- ५, निलंगा- १२, उदगीर- १०, चाकुर- 3, देवणी- ३ अशी रुग्ण संख्या आहे. तर लातुर येथील कोविट रुग्णालयात उपचार घेत असलेले सहा रुग्ण दगावली आहे. यात लातुर येथील तीन, निलंगा येथील दोन तर औश्याचा एकाचा समावेश आहे.
उदगीरची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालली असुन दि. २० जुलै रोजी १० रुग्ण सापडले आहेत. यात देवर्जन- ५, देगलूर रोड- १, अशोक नगर- १, शेल्हाळ- १, धोंडिहिप्पगा- १ अशी असुन आज तीघांचा उदगीर येथील कोविट रुग्णालयात मृत्यू झाला असल्याचे समजते त्यातील एक सारी चा व दोन रुग्ण कोरोना बाधित असल्याचे समजते त्यामुळे उदगीरातील मृत्यांची संख्या १७Slide clips to delete them झाली आहे.