व्यंकटराव पाटील आवलकोंडकर यांना पत्नी शोक
उदगीर.-उदगीर येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा शरद पवार विचार मंचचे संस्थापक सदस्य व्यंकटराव पाटील आवलकोंडकर यांच्या धर्मपत्नी मंदोदरी व्यंकटराव पाटील यांचे आज दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात पती, तीन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. व्यंकटराव पाटील यांच्या दुःखात सर्व आवलकोंड्याचे लोक तसेच राष्ट्रवादी परिवार सहभागी आहे.