बारावीचा निकाल इथे पाहा, या आहेत वेबसाइ

मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे महाराष्ट्र बोर्ड बारावीच्या 2020 परीक्षेचा निकाल (Maharashtra board HSC result 2020) आज (१६ जुलै २०२०) घोषित केला जाणार आहे. दुपारी १ वाजता निकाल जाहीर होईल, असे मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सूचित केले आहे. बारावीची परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांना आपला निकाल MSBSHSE च्या अधिकृत वेबसाइटसह mahresult.nic.in, hscresult.mkcl.org या वेबसाइटवर देखील पाहता येणार आहे.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र एचएससी निकाल २०२० ची एक लिंक अधिकृत वेबसाइटवर अॅक्टिव्हेट करण्यात आली होती. ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, १२वीचे निकाल अद्याप जाहीर झाले नसल्याचं नंतर बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आलं. कारण Mahresult.nic.in वर दाखविण्यात येणारी लिंक ही खरं तर मागील वर्षीची होती. मात्र, काल बारावीच्या निकालाची तारीख आणि वेळ याची अधिकृत घोषणा करुन बोर्डाने याबाबतचा संभ्रम दूर केला.
HSC Result 2020: या वेबसाइटवर पाहता येणार निकाल (List of Websites)
mahresult.nic.in | hscresult.mkcl.org |
examresults.net | indiaresults.com |
HSC Result 2020 - कसा पाहाल mahresult.nic.in यावर निकाल
- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ हे बारावी (HSC), दहावी (SSC) या बोर्ड परीक्षांचे निकाल mahahsscboard.maharashtra.gov.in यावर जाहीर करतं. पाहा आपण आपला निकाल कसा पाहू शकता.
- MSBSHSE ची अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in वर जा
- Maharashtra HSC result 2020 लिंक आपल्याला होम पेजवर दिसेल. त्यावर क्लिक करा.
- त्यानंतर रिझल्ट पेज सुरु होईल
- इथे विद्यार्थ्यांना आपला रोल नंबर आणि आईचं नाव टाकायचं आहे.
- ही माहिती भरुन सब्मिट बटण दाबताच निकाल आपल्या स्क्रिनवर येईल.
विद्यार्थी एसएमएसद्वारे देखील आपला निकाल पाहू शकतात. जर वरील वेबसाइटवर आपल्याला निकाल पाहता येत नसेल तर एचएससी निकाल पाहण्याची ही सर्वात सोपी पद्धत म्हणजे एसएमएस. एसएमएसद्वारे निकाल तपासण्यासाठी पुढील काही गोष्टीच कराव्या लागणार आहेतः
- या स्वरुपात सर्वप्रथम एसएमएस टाइप करा: MHHSCSEAT NO
- आता 57766 वर पाठवा.
- महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल एसएमएस प्रमाणेच संबंधित मोबाइल नंबरवर पाठविला जातो.