आम्ही लातुरकर युवक कृति समितीच्या वतीने नागरिकांना होमिओपॅथी औषधांचे वाटप
लातुर दि.३जुलै २०२० रोजी शहरात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर साळे गल्ली काँटोंमेन्ट परिसरात होमिओपॅथी आर्सेनिक अल्बम ३० हे औषध नागरिकांना आम्ही लातुरकर युवक कृती समितीच्या वतीने मोफत वाटप करण्यात आले.या औषधामुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. जेणेकरून कोरोना विषाणूपासून बचाव होणार आहे
या औषधां सोबतच औषध घेण्यासंबधीचे सुचनापत्रही देण्यात येत आहे. आतापर्यंत ३०० कुटुंबापर्यंत हे औषध देण्यात आले आहे या अभियानात स्वछता निरीक्षक पद्माकर गायकवाड यांच्याहस्ते वाटप करण्यास शुभारंभ करण्यात आला आहे
यावेळी आम्ही लातूरकर युवक कृती समितीचे अड प्रदिपसिंह गंगणे, बालाजीआप्पा पिंपळे, ताहेरभाई सौदागर, अर्जुन माने,मिस्टर नगरसेवक अड सुमित खंडागळे,जमालोदिन मणियार,मिस्टर नगरसेवक तबरेज तांबोळी,दिगंबर सोनी,बाबजी हुलगुंडे,एम एच शेख,चैतन्य फिस्के,अर्षद शेख,मनपा कर्मचारी ज्ञानोबा घोडके,प्रदीप गायकवाड, महेंद्र कांबळे, लिंबाजी मगर आदींनी सहभाग घेतला आहे तर या अभियानास डॉ रविराज पोहरे, अड महेश खणगे, डॉ अंबादास कारेपूरकर यांनी सहकार्य केल्याने अभियान राबविण्यात येत असल्याची माहिती अड प्रदिपसिंह गंगणे यांनी सांगितले आहे