पथविक्रेत्यांनी आत्मनिर्भर योजनेचा लाभ घ्यावा :-मुख्य अधिकारी सुमित जाधव-
देवणी: लाँकडाऊन मुळे देवनी शहरातील मोडकळीस आलेल्या भाजीपाला फळ विक्रेत्याचा व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी खेळते भांडवलाचा पतपुरवठा तातडीने करण्यासाठी राज्य शासनाने केंद्र पुरस्कृत पत विक्रेता आत्मनिर्भर निधी पत विक्रेत्यांसाठी विशेष सुक्षम पतपुरवठा सुविधा योजनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. दहा हजाराचे खेळते भांडवली कर्ज देवणी शहरातील पथविके्ते व फेरीवाल्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे या योजनेचा लाभ जास्तीत जास्त दुकानदाराने घ्यावा असे आव्हान नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सुमित जाधव यांनी केली आहे. सर्व पात्र पथविक्रेत्यांना ही योजना लागू होणार आहे. सदर कर्ज विनातारण असेल ते विविध कालावधीमध्ये किंवा तात्पुरती व्याजदर परतफेड करणारे पुढील वाढीव खेळते भांडवलाच्या कर्जासाठी पात्र राहणार आहेत. त्यात व्याजदर बँकेच्या प्रचलित व्याजदराप्रमाणे तसेच आरबीआयच्या मार्गदर्शक सूचनांनुसार लागू राहील. असेही यावेळी सांगण्यात आले आहे. योजनेमध्ये करणाऱ्या विक्रेत्यांना कॅश बँकेची सुविधा सुद्धा देण्यात येत आहे. देवनी शहरातील सर्व पत विक्रेत्यांनी या संधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा व सविस्तर माहितीसाठी आपल्या नगरपंचायती ला भेट द्यावे असे अहवान मुख्याधिकारी सुमित जाधव यांनी केले आहे