भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या प्रदेश अध्यक्षपदी मा.आ. सुधाकर भालेराव यांची निवड 


 


भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या प्रदेश अध्यक्षपदी मा.आ. सुधाकर भालेराव यांची निवड



 


उदगीर(प्रतिनिधी)-उदगीर मतदारसंघावर गेल्या १० वर्षापासून आमदर म्हणून नावारूपाला आलेले मूळ लाळी.ता.जळकोट येथील सुधाकर भालेराव यांनी उदगीर मतदारसंघाचा कायापालट करून जनतेत व पक्षामध्ये आपल्या कर्तत्वाची चूणूक दाखवत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ते केंद्रीय परीवहन मंत्री नितीन गडकरी व इतर पक्षातील मोठ मोठ्या मंत्र्यांच्या मनातील एक सच्चा नेता,कार्यकर्ता व मागसवर्गीयांचा कूशल संघटक म्हणून सिध्द केले. त्यांच्या आमदारकीचे उदगीर मतदासंघातील गटबाजीमुळे जरी तिकीट जरी कापले गेले असले तरी पक्षात मात्र त्यांना आपले कार्यसिध्द ठेवलेले आहे. यामुळे माजी आ.सुधाकर भालेराव यांना याची खऱी पावती मिळाली व भारतीय जनता पक्षाच्या अनुसुचित जाती मोर्चाच्या प्रदेश अध्यक्षपदी निवड झाली. यामुळे उदगीर मतदारसंघातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील त्यांच्या चाहते, कार्यकर्ते, मित्रपरीवारात आनंद व्यक्त केला जात आहे. ज्यांची राजकीय कारकीर्द संपली कि काय अशी चर्चा होत असताना पक्षाने त्यांच्यावर विश्‍वास ठेवत एक महत्वाचे व विशेष वर्गाला त्यांच्या माध्यमातून न्याय देण्यासाठी त्यांच्यावर जबाबदारी टाकली आहे. सुधाकर भालेराव हे आमदारकीची तिकीट कटले म्हणून निराश न होता आपले पक्षाचे कार्यच चालू ठेवले व उदगीर मतदारसंघातील भाजपाच्या पक्षाच्या वेगळ्या नेतृत्वामधून मी आणखी सक्षम आहे हे त्यांनी दाखवून दिले. मातंग समाजातील असल्यामुळे त्यांनी मातंग शक्ती संघटना संपूर्ण महाराष्ट्रभर वाढवण्याचे काम केले व मातंग समाजाला त्यांनी न्याय मिळून देऊन समाजाची उन्नती केली. त्यांनी आपल्या समाजासोबत इतर समाजाला सुध्दा न्याय देण्याचे काम केले असल्यामुळे इतर प्रवर्गातील समाज ही त्यांच्या पाठीशी खंबीर उभा आहे यामुळे पक्षाने संपूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी दिली. यापुढेही त्यांच्या माध्यमातून अनुसुचित जातीतील समाजाला खरा न्याय मिळावा व सुधाकर भालेराव यांचे नेतृत्व कायम चिरायू राहो अशी जनतेतून त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत.