प्रभाग १७ मध्ये डॉ. चंद्रकांत कोठारे यांच्या तर्फे होमोपॅथीक गोळ्याचे वाटप

उदगीर. - सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव झपाटयाने वाढत आहे. सध्या थंडी, सर्दी व तापीचे वातावरण असल्यामुळे रुग्णांची वाढ होत असून मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. इतर आजाराने ग्रस्त असलेले व वय वर्ष ५० च्या पुढील रुग्णांची काळजी घेणे गरजेचे आहे व शरीरातील रोग प्रतीकारक शक्ती वाढवण्यासाठी भारत सरकार मान्य आयुर्वेदीक, होमोपॅथीक पध्दतीने उपचार करणे आवश्यक आहे.
याचे औचित्य साधून भाजपाचे कार्यकर्ते व प्रभाग १७ चे नगर सेवक व विशेष साई क्लिनीकचे होमीओपॅथीक डॉ. चंद्रकांत कोठारे यांनी घरोघरी जाऊन प्रत्येक कुटुंबाला होमोपॅथीक गोळ्याचे वाटप केले. यावेळी त्यांच्या सोबत भाजपाचे पदाधिकारी यशवंत बारस्कार, सुनील गुडमेवार आदी उपस्थित होते.