शिवाजी महाविद्यालयाने केले जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन
उदगीर -कोरोनामुळे सर्व शाळा, महाविद्यालय बंद असून विषाणूचा प्रसार होऊ नये म्हणून केंद्र आणि महाराष्ट्र सरकारने विद्यार्थाचे नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाईन प्रशिक्षण सुरू करण्याची परवाणगी देण्यात आली आहे.
सध्या उदगीरमध्ये कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. आतापर्यंत 150रुग्ण आढळले त्यापैकी १२ जणांचा मृत्यू झाला आहे . आता २ patients रुग्णांवर उपचार सुरू आहेत…
प्रशासनाने सर्व शाळा व महाविद्यालये बंद करण्याचे निर्देश दिले होते .
पण उदगीर येथे दुसऱ्यांदा अजब प्रकार घडला असून जिल्हाधिकारी यांचे आदेश असूनही शिवाजी महाविद्यालय, उदगीर येथे उघडपणे विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळताना दिसते.
उदगीरमधील गेल्या अनेक दिवसांपासून शिवाजी महाविद्यालयात बीएस्सीचे विद्यार्थी प्रॅक्टिकलसाठी येत असल्याची माहिती व व्हिडिओ समोर आले आणि खळबळ उडाली.
पण यावेळीही गट शिक्षणाधिकारी भगवान फुलारी यांनी पुन्हा आपल्या कर्तव्यास मुकले व उदगीरचे उपजिल्हाधिकारी परवीन मेंगशेट्टी यांना याबाबत माहिती मिळाली व त्यांनी तातडीने कारवाई करण्याचे आदेश शिक्षण विभागाला दिले . या विषयी केंद्र प्रमुख धमणसुरे हे दै. एकजूट लोकजागृतीशी बोलताना म्हणाले कि महाविद्यालयातर्फे विद्यापीठाचे मागील पत्र दाखवत विद्यार्थांना बोलावत असल्याचे सांगण्यात आले यामुळे तहसीलदारांना भेटण्यास सांगण्यात आले आहे यावर योग्य कार्यवाही तहसीलदार करतील असे सांगण्यात आले.
आजच्या २० दिवस अगोदर, उदगीरच्या अक्षरनंदन स्कूलने कोव्हिड १९ च्या नियमाचे उल्लंघन करून विद्यार्थ्यांना बोलावून वर्ग घेण्यात आले होते. यावर गट शिक्षणाधिकारी भगवान फुलारी स्कूल वर कारवाई करण्यास सक्षम होते. पण ते तसे न करता संस्थाचालक व शाळेस वाचवण्याचा प्रयत्न करत होते. यामुळे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत आणि उपजिल्हाधिकारी परवीन, मेंगशेट्टी व तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी कारवाई करत मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल केला.