वृक्षारोपण करून दिनेश पाटील यांचा वाढदिवस साजरा
उदगीर( प्रतिनिधी) उदगीर तालुक्यातील तिवटग्याळ येथील मातोश्री सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष तथा ग्रंथालय चळवळीतील युवा कार्यकर्ते दिनेश पाटील यांचा वाढदिवस सामाजिक डिस्टनसिंगचे नियम पाळत मोठ्या उत्साहात वृक्षारोपण करून व सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. यावेळी तिवटग्याळ-- शेकापूर रस्त्यावर वृक्षारोपण करण्यात आले. या प्रसंगी ग्रंथालय चळवळीचे ज्येष्ठ नेते ग्रंथमित्र सूर्यकांत शिरसे, रामेश्वर बिरादार नागराळकर, ग्रंथालय चळवळीचे कार्यकर्ते तथा भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस लक्ष्मण फुलारी (भालके) रेड्डी यलम महासंघाचे तालुकाध्यक्ष रामकिशन नादरगे, वामनराव मोठेवाड, छगन पाटील, बाळू पाटील, पत्रकार एल. पी. उगिले इत्यादी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी शुभेच्छा देताना सूर्यकांत शिरसे यांनी सांगीतले की, ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्त्यांनी दिनेश पाटील यांचा आदर्श घ्यावा. सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम करण्याची त्यांची भूमिका उल्लेखनीय आहे. पर्यावरणाशी जोडला गेलेला एक प्रगतशील शेतकरी असून देखील ग्रंथालय चळवळीला चालना देण्याचे काम ते करत आहेत. हे उल्लेखनीय आहे असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक लक्ष्मण फुलारी (भालके) यांनी तर आभार प्रदर्शन रामेश्वर बिरादार नागराळकर यांनी केले.