उदगीर येथील 31 पैकी 12 पॉझेटिव्ह तर एकाचा मृत्यू
उदगीर :-येथुन काल 31 स्वॅब पाठवण्यात आले होते त्यापैकी 12 पॉझेटिव्ह रुग्ण आले त्यात उदगीर शहरातील हिंदु खाटिक गल्ली 01, साई धाम सोसायटी 01, सय्यद चाँद दर्गा 01, निडेबन 01, भगीरथ नगर 02, शिवनगर एस.टी. कॉलनी 01, हरकरे नगर 01, संत कबीर नगर 01, सराफ लाईन 01, विजय नगर 01, वाढवणा 01 तर रात्री उशीरा चौबारा रोड येथील एका 90 वर्षाच्या रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे,
उदगीर कोविड येथे आत्तापर्यंत 349 पॉझेटिव्ह रुग्ण आढळले असून 204 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. 10 घरी उपचार घेत आहेत व कोवीड हॉस्पिटल येथे 35 तर तोंडार पाटी येथे 38 असे एकूण 76 जण उपचार घेत आहेत. आत्तापर्यंत 28 रुग्णांना बाहेर पाठवण्यात आले आहे 24 रुग्णाचे मृत्यू झाले आहे.