लातूर 240 पैकी 164 निगेटिव्ह 19 पॉझिटिव्ह तर उदगीर निरंक

 


लातूर 240 पैकी 164 निगेटिव्ह 19 पॉझिटिव्ह 22 Inconclusive 35 प्रलंबित


विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेचे आज एकूण 59 व्यक्तींचे स्वब तापसणीसाठी आले होते त्यापैकी 36 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून 14 व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व 09 व्यक्तिचे अहवाल Inconclusive आले आहेत. 


दिनांक 04.07.2020 रोजी लातूर जिल्ह्यातील 25 व्यक्तींचे अहवाल प्रलंबित होते त्यापैकी 07 व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आले असून 06 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व 12 व्यक्तिचे अहवाल Inconclusive आले आहेत अशी माहिती विषाणू सांशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.



उदगीर येथील 12 स्वॅब तपासण्यासाठी गेले होते त्यात 09 निगेटिव्ह व 03 प्रलंबित आले आहेत.  तर देगलूर रोड येथील 75 वर्षाय रूग्णाचा मृत्यू झाला आहे.



विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेच्या रुग्णालयात एकूण 78 कोरोना (कोविड19) पॉझिटिव्ह रुग्ण दाखल आहेत व आज 03 रुग्णांची प्रकृती पूर्णपणे बरी झाल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आज एका 65 वर्ष वय असलेल्या रुग्णास दमा व निमोनिया हे आजार होते त्यांचा उपचारादरम्यान दुपारी 12.30 वाजेच्या दरम्यान मृत्यू झाला आहे अशी माहिती कोरोना विलगीकरण कक्षाचे प्रमुख डॉ. रामराव मुंढे यांनी दिली.