15 जुलै ते 30 जुलै 2020 पर्यंत संचारबंदी आदेश जारी
लातूर,दि.13-(जिमाका) जिल्हयात कोरोना विषाणुचा वाढत चाललेला प्रार्दुभाव व रुग्णसंख्या विचारात घेता कोरोना विषाणुच्या संसर्गाची साखळी तोडण्याच्या दृष्टीकोनातुन खबरदारीचा उपाय म्हणून संपुर्ण जिल्हयात संचारबंदी लागू करणे आवश्यक असल्याने जिल्हादंडाधिकारी जी. श्रीकांत यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये संपूर्ण लातूर जिल्हयात दिनांक 15 जुलै 2020 ते दिनांक 30 जुलै 2020 पर्यंत संचारबंदी आदेश जारी केले आहेत.
या आदेशाचे काटेकोरपणे अंमलबजावणी करुन तात्काळ कार्यवाही करण्यात यावी. आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती, संस्था, अथवा समुह, भारतीय दंड संहिता 1860, साथरोग प्रतिबंधक कायदा 1897, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, मधील तरतुदी नुसार शिक्षेस पात्र राहील. परंतु आदेशाची अंमलबजावणी करताना सदभावनेने केलेल्या कृत्यासाठी कोणत्याही अधिकारी/ कर्मचारी यांचे विरुध्द कार्यवाही केली जाणार नाही असे ही आदेशात नमुद केले आहे.