उदगीरात कोरोनाचा धमाका आज 12 तर तीन दिवसात 24 पॉझिटिव्ह

उदगीरात कोरोनाचा धमाका आज 12 तर तीन दिवसात 24 पॉझिटिव्ह 



लातूर - उदगीरची धक्कादायक बातमी असून आज दि.17 जूलै रोजी 12 पॉझेटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यामध्ये विकास नगर 04, अशोक नगर 01, राम नगर01, अप्पा राव चौक 01, एस.टी. कॉलनी 01, राम नगर 01, खडकाळ गल्ली 01,हावगी स्वमी चौक 01, देगलूर रोड सागर हॉटेलच्या मागे 01 विशेष म्हणजे एसडीएच कॉर्टरला 01 असे एकूण 12 रुग्ण सापडले आहेत तर तीन दिवसात 24 कोरोनाने रूग्णांनी उदगीरला घेरले आहेत.


मागील दोन दिवसात दि.14 रोजी येथून 13 स्वॅब प्रलंबित होते तर दि. 15 जूलै रोजी त्यात 07 पॉझेटिव्ह आले होते यात आमीन नगर 02, साई धाम 01 निडिबन,नई आबादी 02, गुडसूर 01, व तोंडार 01 व आज दि.16 जूलै रोजी 06 स्वॅब प्रलंबित होते त्यात उदयगीरी हॉस्पिटलच्या मागे 01, गांधी नगर 01, नळगीर 01व डोंगर शेळकी 01 असे 05 पॉझेटिव्ह रिपोर्ट आले आहेत. अत्तापर्यंत 170 पॉझेटिव्ह मध्ये 113 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहेत तर उदगीर येथील 11 व जळकोट 01 असे एकूण 12 जणांचा मृत्यू झाला व 22 कोविड रुग्णालयात व 15 जण कोरोटाईन असे एकूण 37 उपचार घेत आहेत. उदगीर येथून अतिसंवेदनशील 06 जणांना बाहेर उपचारसाठी पाठवण्यात आले आहे.


 


 


 


 


                                          .