उदगीर येथील 11 पॉझेटिव्ह तर तिघांचा मृत्यू
उदगीर :-येथुन काल 22 स्वॅब पाठवण्यात आले होते त्यापैकी 11 पॉझेटिव्ह रुग्ण आले त्यात सायंकाळी 04 पॉझेटिव्ह मध्ये
आज कोरोनामुळे उदगीर शहरातील नालंदानगर-01,बसवेश्वर चौक-१ आणि डोंगरशेळकी येथील-१ या तिघांचा मृत्यू झाला आहे.
सकाळी आलेले 07 मध्ये व्यंकटेश हॉस्पिटल 01, शेल्हाळ रोड 01, पोलिस कॉटर 01, नालंदा नगर, खडकाळ गल्ली 01, श्रीनगर 01, तोंडचिर 01 आले असून. 10. निगेटिव्ह
तर 04 प्रलंबित व 01 रद्द झाले आहे. पॉझेटिव्ह आलेल्यावर उपचार सूरु आहे. काल गांधी नगर येथील एका महिलेचा लातूर येथे अल्फा हॉस्पिटल येथे पहाटे मृत्यू झाला त्यामुळे रुग्णाच्या मुलाने डॉक्टरवर चाकूने हल्ला केला यावेळी डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे दुदैवी घटना टकली. जिल्हाधिकारी स्वतः हस्तक्षेप करून कार्यवाई केली. यामुळे खाजगी डॉक्टरामध्ये कोविड रुग्णाच्या उपचार संदर्भात भितीचे वातावरण झाले आहे.
उदगीर कोविड येथे आत्तापर्यंत 337 पॉझेटिव्ह रुग्ण आढळले असून 204 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. 10 घरी उपचार घेत आहेत व कोवीड हॉस्पिटल येथे 35 तर तोंडार पाटी येथे 38 असे एकूण 76 जण उपचार घेत आहेत. आत्तापर्यंत 28 रुग्णांना बाहेर पाठवण्यात आले आहे 23 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.